चॅलेंज! फ्रीजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज बॉलिवूडवर करतोय राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 19:49 IST2023-02-23T19:43:01+5:302023-02-23T19:49:23+5:30
सोशल मीडिया स्क्रोल करताना आम्हाला एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सापडला. फोटोमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे.

चॅलेंज! फ्रीजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज बॉलिवूडवर करतोय राज्य
Bollywood Actor Unseen Childhood Photo: सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो चर्चेत येत आहे.
सोशल मीडिया स्क्रोल करताना आम्हाला एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा फोटो सापडला. फोटोत हा लहान मुलगा फ्रीजमध्ये बसून मजा करताना दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ओळखता येत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोटो इतर कोणाचा नसून हँडसम हंक विक्की कौशलचा आहे. फोटोमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे.
विकी कौशल हा बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्सपैकी एक बनला आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाने तो स्टार झाला. . या अभिनेत्याला त्याच्या 'सरदार उधम' चित्रपटासाठी यंदाच्या आयफा 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.