​तुम्हाला माहीत आहे का झहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे या अभिनेत्याची मुलगी आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 12:32 PM2017-04-25T12:32:46+5:302017-04-25T18:02:46+5:30

सागरिका घाटगे हे नाव चक दे इंडिया या चित्रपटामुळे नावारूपाला आले. या चित्रपटात तिने एका हॉकी प्लेअरची भूमिका साकारली ...

Do you know Zaheer Khan's wife Sagarika Ghatge is the daughter of the actor | ​तुम्हाला माहीत आहे का झहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे या अभिनेत्याची मुलगी आहे

​तुम्हाला माहीत आहे का झहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे या अभिनेत्याची मुलगी आहे

googlenewsNext
गरिका घाटगे हे नाव चक दे इंडिया या चित्रपटामुळे नावारूपाला आले. या चित्रपटात तिने एका हॉकी प्लेअरची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती एका मराठी चित्रपटातही झळकली. गेल्या कित्येक दिवसांपासून सागरिका तिच्या व्यवसायिक नव्हे तर वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला अनेक समारंभ, पार्टी यांमध्ये क्रिकेटर जहीर खानसोबत पाहिले जात आहे. क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नालादेखील तिने जहीरसोबतच उपस्थिती लावली होती. जहीर आणि तिने नेहमीच त्यांच्या नात्याबद्दल मौन राखणे पसंत केले आहे. पण आता त्या दोघांनी साखरपुडा केला असून ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सना दिली आहे.
जहीर हा प्रसिद्ध क्रिकेटर असून त्याने भारतासाठी अनेक मॅचेस खेळल्या आहेत. सागरिका ही अभिनेत्री असल्याचे सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत तिची आणखी एक ओळख आहे. ती बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी आहे. प्रेमरोग हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात पद्मिनी कोल्हापूरेच्या पतीची भूमिका विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याने साकारली होती. सागरिका ही विजयेंद्र घाटगे या अभिनेत्याची मुलगी आहे. विजयेंद्र यांनी सत्तरीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्तचोर, रजिया सुलतान, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. त्यांनी चित्रपटाप्रमाणेच जुनून, सिंहासन बत्तीसी, बुनियाद यांसारख्या मालिकांमध्येदेखील काम केले आहे. 
विजयेंद्र सिंहराव घाटगे हे इंदौरच्या शाही घराण्याचे वंशज आहेत. इंदौरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या सीताराजे घाटगे यांचे विजयेंद्र हे पुत्र आहेत. 

vijendra ghatge

Web Title: Do you know Zaheer Khan's wife Sagarika Ghatge is the daughter of the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.