फोटोत पतीसोबत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का ?, ती होती एक बास्केटबॉल खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 07:00 AM2023-01-31T07:00:00+5:302023-01-31T07:00:07+5:30

ती एक बास्केटबॉल खेळाडू होती. ती 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि तिच्यावर अचानक घराची सगळी जबाबदारी आली.

Do you recognize the bollywood actress seen with her husband in the photo? | फोटोत पतीसोबत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का ?, ती होती एक बास्केटबॉल खेळाडू

फोटोत पतीसोबत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का ?, ती होती एक बास्केटबॉल खेळाडू

googlenewsNext

बऱ्याचदा कलाकार त्यांचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच एक हिंदी चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत नवऱ्यात दिसणाऱ्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?, आज या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रिती झिंटा आहे. प्रितीने 2016 मध्ये  प्रितीने यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली. गेल्यावर्षी ती दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे.. प्रितीने सरोगसी पद्धतीने तिच्या बाळांना जन्म दिला आहे.

 31 जानेवारी 1975 ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ती 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. यात तिची आईदेखील जखमी झाली होती. दोन वर्षे तिची आई बिछाण्यावर होती. या दोन वर्षांत अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या घटनेने प्रितीचे अख्खे आयुष्य बदलले. पण प्रितीने हार मानली नाही.

मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केले. लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. याचकाळात तिची निर्माते शेखर कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिला चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या अ‍ॅड एजन्सीची एक जाहिरातही ऑफर केली. शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण  पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर 1998 मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला.

 पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती केवळ 20 मिनिटे दिसली. पण या 20 मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.


 

Web Title: Do you recognize the bollywood actress seen with her husband in the photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.