ओळखलंत का या चिमुकल्यांना?, फोटोत दिसणाऱ्या या निरागस मुली आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 16:45 IST2023-10-19T16:38:41+5:302023-10-19T16:45:44+5:30
फोटोमध्ये दिसणार्या दोन बहिणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

ओळखलंत का या चिमुकल्यांना?, फोटोत दिसणाऱ्या या निरागस मुली आज आहेत प्रसिद्ध अभिनेत्री
गेलेली वेळ कधीच परत येत नाही, फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि टिव्हीमध्ये काम करणाऱ्या अभिनेता- अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत..
बॉलिवूड सेलिब्रिटीं(Bollywood Celebs) च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचे आवडते कलाकार बालपणी कसे दिसायचे किंवा ते कुठून शिकले, कुठे राहत होता. बॉलीवूडप्रेमींना नेहमीच अशा सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोन लहान मुली दिसत आहेत, ज्यांच्या गळ्यात माळ आहे. फोटोमध्ये दिसणार्या दोन्ही मुली त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ब्लॅक फ्रॉकमध्ये बहीणसोबत दिसणारी ही अभिनेत्री नॅशनल अवॉर्डविनिंग अभिनेत्री आहे.
काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसणार्या या मुलीला फोटो पाहून ओळखलंत का? फोटोत दिसणारी या दोन बहिणी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून फराह नाज (Farah Naaz) आणि तब्बू (Tabu)आहेत. होय, काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसणारी मुलगी तब्बू आहे. तब्बू ही अशीच एक बॉलिवूडमधील अभिनेत्री (Bollywood Actress Tabu) आहे जिचे फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. तब्बू आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.