फोटोतल्या या चिमुरड्याला ओळखलंत का?, 'डॉन' बनून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवण्यासाठी झालाय सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:14 PM2023-08-10T15:14:09+5:302023-08-10T15:14:58+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्याने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे आणि आता तो नवीन भूमिकेत रसिकांच्या भेटीला येतो आहे.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)ने गेल्या दिवसापासून सोशल मीडियाच्या जगावर अधिराज्य गाजवले आहे. आदल्या दिवशी फरहान अख्तरने त्याच्या आगामी चित्रपट डॉन ३चा टीझर चाहत्यांसोबत शेअर केला. डॉन ३च्या टीझरमध्ये शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग थैमान घालताना दिसला. टीझरमध्ये रणवीर सिंगने डॉनच्या भूमिकेत ग्रँड एन्ट्री केली आहे. रणवीर सिंगची ही स्टाईल चाहते अजूनही विसरू शकलेले नाहीत. दरम्यान, रणवीर सिंगने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्याची तयारी केली आहे.
रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रणवीर सिंगने त्याच्या बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये छोटा रणवीर सिंग बंदूक घेऊन खेळताना दिसत आहे. फोटोमध्ये रणवीर सिंग पांढऱ्या निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये रणवीर सिंगनेही हातात बंदूक घेतली असून, त्यासोबत तो जबरदस्त पोज देत आहे.
हे फोटो पाहून लोक म्हणत आहेत की, रणवीर सिंगला लहानपणापासूनच डॉन व्हायचं होतं. हे फोटो शेअर करताना रणवीर सिंहने लिहिले की, खूप पूर्वी मी अशा गोष्टी करायचो. मी खूप नाटकी होतो. मी लहानपणी चित्रपटांच्या प्रेमात पडलो. मला अभिनयाची आवड होती. मी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान बघत मोठा झालो. दोघेही बॉलिवूडचे मोठे कलाकार आहेत.
माझ्यासाठी हे मोठे आव्हान असणार आहे
रणवीर सिंगने पुढे लिहिले की, आज मला त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे. आजही या तारकांचा प्रभाव माझ्यावर दिसत आहे. आज मी माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. डॉनचे साम्राज्य पुढे नेणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. मला आशा आहे की लोक मला डॉन म्हणून भरभरून प्रेम देतील. अनेक वर्षांपासून लोक डॉनवर प्रेम करत आहेत. आता हे प्रेम गोळा करण्याची माझी वेळ आहे. मी वचन देतो की हा चित्रपट तुम्हाला निराश करणार नाही.