बिल्ला तुम्हाला आठवतोय काय?, ज्याचे आयुष्य बनले एक मिस्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 09:34 AM2018-04-25T09:34:41+5:302018-04-25T15:04:41+5:30

हिंदी चित्रपटांमध्ये जेवढी महत्त्वाची भूमिका नायकाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका खलनायकाचीदेखील असते. कारण खलनायक जेवढा खतरनाक असतो, तेवढी हिरोगिरी ...

Do you remember the badge, whose life became a mystery !! | बिल्ला तुम्हाला आठवतोय काय?, ज्याचे आयुष्य बनले एक मिस्ट्री!!

बिल्ला तुम्हाला आठवतोय काय?, ज्याचे आयुष्य बनले एक मिस्ट्री!!

googlenewsNext
ंदी चित्रपटांमध्ये जेवढी महत्त्वाची भूमिका नायकाची असते तेवढीच महत्त्वाची भूमिका खलनायकाचीदेखील असते. कारण खलनायक जेवढा खतरनाक असतो, तेवढी हिरोगिरी दाखविण्याची संधी नायकाकडे असते. बॉलिवूडमध्ये असाच एक खतरनाक खलनायक अर्थात माणिक ईरानी याची एकेकाळी एंट्री झाली होती. त्याचे हे नाव जरी बºयाच लोकांना माहिती नसले तरी, जुन्या चित्रपटांमधील त्याचे भयावह रूप अजूनही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटात ‘बिल्ला’ नावाचा खलनायक साकारून माणिक ईरानी याने इंडस्ट्रीत आपले अस्तित्व दाखवून दिले. पुढे तर त्याला ‘बिल्ला’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. 



चित्रपटातील माणिकचा एक वेगळाच अंदाज आणि रुबाब होता. त्याचा लूक तर असा होता की, अनेकांना थरकाप व्हायचा. माणिकने १९७४ मध्ये चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्याने ‘कालिचरण, त्रिशूल, मिस्टर नटवरलाल, शान, कसम पैदा करनेवाले की’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारून इंडस्ट्रीत दमदार खलनायक म्हणून स्वत:ला सिद्ध केले. सुभाष घई यांच्या ‘कालिचरण’मध्ये तर माणिकने एका मूकबधिर खलनायकाची भूमिका साकारली होती. परंतु अशातही तो प्रेक्षकांमध्ये भीती निर्माण करण्यास यशस्वी ठरला होता. 



माणिकने ८० आणि ९० च्या दशकात पडद्यावर चांगलेच वर्चस्व गाजविले. मात्र त्यानंतर तो पडद्यावरून अचानकच गायब झाला. ग्लॅमर वर्ल्डमध्ये वावरताना तो नशेच्या आहारी गेला. त्यातूनच त्याला अनेक आजारांची लागण झाली. अन् एके दिवशी त्याने या जगाचा निरोप घेतला. परंतु त्याचा मृत्यू कसा झाला याविषयीची कुठलीही बाब अद्यापपर्यंत समोर आली नाही. मात्र असे म्हटले जाते की, दारूच्या नशेमुळेच त्याचा मृत्यू झाला असावा. काही लोक तर असेही म्हणतात की, त्याने आत्महत्या केली असावी. 

Web Title: Do you remember the badge, whose life became a mystery !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.