अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भूतनाथमध्ये झळकलेला बंकू आठवतोय का? बघा आता दिसतो फारच स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:06 PM2021-07-15T18:06:13+5:302021-07-15T18:11:26+5:30

मिताभ बच्चन, जुही चावला, शाहरुख खान यांच्या भूमिकेने रसिकांची मनं तर जिंकली होती पण बंकू भूमिका साकारणारा अमन सिद्दीकीला विशेष पसंती मिळाली.

Do you remember Banku starring in Bhootnath with Amitabh Bachchan? This Is How He Looks Now | अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भूतनाथमध्ये झळकलेला बंकू आठवतोय का? बघा आता दिसतो फारच स्मार्ट

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भूतनाथमध्ये झळकलेला बंकू आठवतोय का? बघा आता दिसतो फारच स्मार्ट

googlenewsNext

कोणताही चित्रपट असो त्या चित्रपटात बालकलाकार भूमिका साकारत असेल तर रसिकांनाही ऑनस्क्रीन त्यांना पाहण्यात मजा येते. रसिकांना बर्‍याचदा बाल कलाकारांच्या भूमिका आवडतात.बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यात बाल कलाकारांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. बालकलाकारांच्या गाजलेल्या भूमिका आजही रसिकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. 

 

भूतनाथ या चित्रपटामध्ये बाल कलाकार बंकू तुम्हाला चांगलाच आठवत असणार. चित्रपटाचे नाव घेताच बंकू नाही आठवला तरच नवल. अमिताभ बच्चन, जुही चावला, शाहरुख खान यांच्या भूमिकेने रसिकांची मनं तर जिंकली होती पण बंकू भूमिका साकारणारा अमन सिद्दीकीला विशेष पसंती मिळाली. याच भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली.

 

भूतनाथ या चित्रपटात बंकू म्हणजेच अमन सिद्दीकी आणि अमिताभ बच्चन यांच्यात चांगली केमिस्ट्री होती आणि त्या दोघांचीही भूमिका अप्रतिम होती, जी आजपर्यंत लोक विसरलेले नाहीत. लहान मुलांमध्ये भूतनाथ चित्रपटाची क्रेझ अजूनही तशीच आहे आणि जेव्हा जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर येतो तेव्हा लहान मुले तितक्याच आवडीने पाहतात.

अमन सिद्दीकी या चित्रपटानंतर फारसा कोणत्या चित्रपटात झळकला नाही. या चित्रपटानंतर अमनला आणखी बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या, अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून त्याने कोणत्याच ऑफर्स स्विकारल्या नाहीत. चित्रपटांना नकार दिला असला तरी काही टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. चित्रपटात झळकलेला छोटा अमन आता मोठा झाला आहे. जितका तो लहान असताना क्युट दिसायचा तितकाच आता तो स्मार्ट दिसतो. त्याचा लूक पाहून तुम्हीही त्याला ओळखणारही नाही. अभिनय क्षेत्राशी तो लांब असला तरी अमिताभ बच्चन यांच्याशी अमन सिद्दीकीचे आजही खूप चांगले नाते आहे. वेळ मिळतो तेव्हा अमन आजही अमिताभ बच्चन यांची आवर्जुन भेट घेत असतो. 

Web Title: Do you remember Banku starring in Bhootnath with Amitabh Bachchan? This Is How He Looks Now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.