‘थ्री इडियट्स’मधील मिलिमीटर तुम्हाला आठवतोय काय? आता झाला सेंटिमीटर, पहा त्याचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 04:13 PM2017-09-24T16:13:03+5:302017-09-24T21:43:03+5:30
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान स्टारर ‘थ्री इडियट्स’ (२००९) रिलीज होऊन जवळपास नऊ वर्ष झाली आहेत. बॉक्स आॅफिसवर सुपरडूपर ...
ब लिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान स्टारर ‘थ्री इडियट्स’ (२००९) रिलीज होऊन जवळपास नऊ वर्ष झाली आहेत. बॉक्स आॅफिसवर सुपरडूपर हिट ठरलेल्या या चित्रपटातील सर्वच पात्र दमदार होते. मग तो छोटा मनमोहन ऊर्फ मिलिमीटर असो वा इतर दुसरे पात्र असो, आजही हे सर्व पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आज आम्ही तुम्हाला मिलिमीटर या पात्राविषयी सांगणार आहोत. मिलिमीटरच्या भूमिकेत असलेला राहुल कुमार आता सेंटिमीटर झाला आहे. होय, राहुल आता मोठा झाला असून, लवकरच तो ‘ब्रूनी द फिल्म’ आणि ‘जू’ या चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.
राहुलचा जन्म ९ सप्टेंबर १९९५ मध्ये उत्तराखंडमधील अलमोरा येथे झाला. त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात थिएटरमधून केली. पुढे त्याने बालकलाकार म्हणून ‘ओमकारा (२००६), द ब्लू अंब्रेला (२००५), जीना है तो ठोक डाल (२०१२) आणि थॉट फिल्म द थीफ (२०१५) मध्ये काम केले. राहुल एक अभिनेता असण्याबरोबरच उत्कृष्ट गायकही आहे. सध्या राहुलचे वय २२ वर्ष असून, त्याला आता आणखी काही दमदार भूमिका साकारायच्या आहेत.
राहुलने चित्रपटांबरोबरच जाहिरातींमध्येही काम केले. आतापर्यंत त्याने ‘ब्रिटानिया, आयडिया आणि आयपीएलच्या जाहिरातींमध्ये काम केले. त्याच्या छोट्या पडद्यावरील करिअरविषयी सांगायचे झाल्यास त्याने ‘बदतमीज दिल (२०१५), यम है हम (२०१५), नीले छत्री वाले (२०१५) आदी मालिकांमध्ये काम केले. आता त्याला चित्रिपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करायचे आहे.