रेखा यांच्या 'खून भरी मांग' सिनेमातील नंदिनी आठवतेय का?, ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:17 PM2022-08-06T12:17:38+5:302022-08-06T12:18:16+5:30

Sonu Walia : नंदिनी उर्फ सोनू वालियाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. सोनू वालियाचे काही नवीन जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Do you remember Nandini from Rekha's movie 'Khun Bhari Maang'?, it has become difficult to recognize | रेखा यांच्या 'खून भरी मांग' सिनेमातील नंदिनी आठवतेय का?, ओळखणंही झालंय कठीण

रेखा यांच्या 'खून भरी मांग' सिनेमातील नंदिनी आठवतेय का?, ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सोनू वालिया (Sonu Walia) मिस इंडिया स्पर्धा आणि मॉडेलची विजेती आहे. तिच्या बालपणीचे नाव संजीत कौर वालिया होते. त्याचबरोबर तिने ग्लॅमरस दुनियेत पाऊल ठेवताच तिचे नाव बदलून सोनू वालिया असे ठेवले. सोनूने एक नाही तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्या टॅलेंटने खास ओळख निर्माण केली आहे. आता तिचा लूक पूर्णपणे बदलला असून तिला ओळखणं कठीण झालं आहे.

सोनू वालियाने 'खून भरी मांग', 'यश', 'नंबरी आदमी', 'हातिम', 'तहलका', 'तेजा', 'फैजी', 'जीवन दाता', 'अपना देश पराये लोग', 'खेल', ' कसम' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 'खून भरी मांग' या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

आता सोनू वालियाचा लूक पूर्णपणे बदलला आहे. सोनू वालियाचे काही नवीन जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच सोनू वालियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. आणखी एका जुन्या चित्रात ती तिच्या फ्रेंड्ससोबत उभी असलेली दिसत आहे.

सोनू वालियाचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहून तिचे फॅन्सही चकित झाले आहेत. एक चाहता म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप बदललात का? तर दुसऱ्या चाहत्याने सांगितले की, तुमचे चित्रपट आणि तुमची शैली आजही लोकप्रिय आहे. तर त्याचवेळी एका यूजरने सांगितले की, काळासोबत किती बदल होतो.

Web Title: Do you remember Nandini from Rekha's movie 'Khun Bhari Maang'?, it has become difficult to recognize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rekhaरेखा