‘काबील’चे मोशन पोस्टर तुम्ही पाहिलेतं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 11:14 AM2016-10-25T11:14:43+5:302016-10-25T11:14:43+5:30
‘काबील’मध्ये हृतिक रोशन कुठली भूमिका साकारणार, हे रहस्य उघड झाले आहे. होय, हृतिक व यामी गौतम यांच्या ‘काबील’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज झाले. हृतिक यात कुठली भूमिका साकारणार, हे या मोशन पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. ‘काबील’च्या पहिल्या पोस्टरमध्ये केवळ हृतिकचे डोळे दाखवण्यात आले होते. मोशन पोस्टरमध्ये हृतिक हातात काठी घेतलेला दिसतो आहे. याचा अर्थ या चित्रपटात तो दृष्टिहिन व्यक्तिची भूमिका साकारणार आहे.
‘ ाबील’मध्ये हृतिक रोशन कुठली भूमिका साकारणार, हे रहस्य उघड झाले आहे. होय, हृतिक व यामी गौतम यांच्या ‘काबील’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज झाले. हृतिक यात कुठली भूमिका साकारणार, हे या मोशन पोस्टरवरून स्पष्ट झाले आहे. ‘काबील’च्या पहिल्या पोस्टरमध्ये केवळ हृतिकचे डोळे दाखवण्यात आले होते. मोशन पोस्टरमध्ये हृतिक हातात काठी घेतलेला दिसतो आहे. याचा अर्थ या चित्रपटात तो दृष्टिहिन व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. अर्थात ‘ऐसा शख्स जो सबकुछ देख सकता है. उसकी कमजोरी ही उसकी ताकत है,’असे पोस्टरवर लिहिले असल्याने यामागील सस्पेन्स वाढला आहे. अद्याप ‘काबील’चा प्लॉट कळलेला नाही. अलीकडे चित्रपटाचे टीजर जारी करण्यात आले होते. मात्र यातूनही सिनेमाच्या कथेबद्दल कुठलाही अंदाज बांधता आला नव्हता.
या चित्रपटात यामी गौतम हृतिकच्या अपोझिट दिसणार आहे. ही जोडी प्रथमच आॅनस्क्रीन एकत्र येणार असल्याचे प्रेक्षक तिला पाहण्यास उत्सूक आहेत. राकेश रोशन निर्मित ‘काबील’ पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यावेळी बॉक्सआॅफिसवर ‘काबील’ विरूद्ध शाहरूखचा ‘रईस’ असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
अलीकडे हृतिकचा ‘मोहेंजोदडो’ येऊन गेला. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या चित्रपटाकडून हृतिकला बºयाच अपेक्षा होत्या. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि एका हिटचे हृतिकचे स्वप्नही भंगले. निश्चितपणे अशास्थितीत हृतिक ‘काबील’बद्दल उत्सूक आहे. करिअरला गती देण्यासाठी ‘काबील’ हिट होणे हृतिकसाठी गरजेचे आहे. पण शेवटी प्रेक्षक मायबापच हृतिकचे नशीब ठरवणार आहेत. तेव्हा बघू, हृतिकच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे ते?