लांबसडक केस कापल्यानंतरचा प्रियांका चोप्राचा नवा लूक तुम्ही पाहिलातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 04:35 AM2017-11-21T04:35:10+5:302017-11-21T10:05:10+5:30
साता समुद्रापार हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियांका चोप्राने आपल्या केसांचे बलिदान दिल्याची बातमी आम्हीच तुम्हाला दिली होती. लांबलचक केस कापण्याचा ...
स ता समुद्रापार हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियांका चोप्राने आपल्या केसांचे बलिदान दिल्याची बातमी आम्हीच तुम्हाला दिली होती. लांबलचक केस कापण्याचा निर्णय शेवटी प्रियांकाला का घ्यावा लागला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अर्थात याचे उत्तरही प्रियांकानेच दिले होते. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत प्रियांकाचे कापलेले केस सगळीकडे विखुरलेले दिसले होते. हा फोटो पाहून अनेकांची मने हळहळली होती.‘बाय बाय लॉन्ग हेअर...सीजन ३ मध्ये एलेक्स पारिशचे लूक कसे असणार? तुम्हाला लवकरच कळेल,’ असे तिने या फोटोसोबत लिहिले होते. म्हणजेच, ‘क्वांटिको3’साठी प्रियांकाला तिचे लांबसडक केस कापावे लागले होते. ही एवढी मोठी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, केस कापल्यानंतरचे प्रियांकाचे लूक समोर आले आहे.
ALSO READ: OMG!! प्रियांका चोप्राने ‘हॉलिवूड’साठी कापले लांबसडक, सुंदर केस!
होय, प्रियांकाने आपल्या नव्या लूकचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात प्रियांकाचे केस बरेच आखूड दिसत असून तिचे लूकही बदललेले दिसतेय. ‘हेअरकट केल्यानंतर वारंवार केसांना हात लावून सगळे नीट आहे ना बघतेय...’या कॅप्शनसह प्रियांकाने हे फोटो शेअर केले आहेत. निश्चितपणे प्रियांका या लूकमध्ये नेहमीप्रमाणेच कमालीची सुंदर दिसतेय. तुम्हाला प्रियांकाचा हा नवा लूक कसा वाटला, हे सांगायला विसरू नका.
प्रियांका सध्या ‘क्वांटिको3’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय अनेक लाईव्ह परफॉर्मन्सच्या आॅफर्स तिला मिळत आहेत. अलीकडे एका अवार्ड शोमध्ये ३० मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी प्रियांकाला १२ कोटी रुपए आॅफर केले गेलेत. एकंदर काय तर बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांना एक पूर्ण चित्रपटासाठी मिळत नाहीत, इतके पैसै प्रियांकाला अर्ध्या तासासाठी आॅफर केले गेलेत आहेत. ‘क्वांटिको3’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती. ‘क्वांटिको3’तील प्रियांकाची भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. कोट्यवधी लोकांची मने तिने जिंकलीत. यानंतर एकापाठोपाठ एक हॉलिवूड सिनेमेही तिला मिळालेत.