'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:16 AM2022-11-01T11:16:41+5:302022-11-01T11:17:06+5:30

Katrina Kaif : कतरिना कैफने सोशल मीडियावर हटके फोटोशूट शेअर केले आहे. तिच्या या फोटोशूटवरील विकी कौशलच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले घेतले आहे.

'Done..Tata..Bye Bye...!' Husband Vicky Kaushal's reaction after seeing Katrina Kaif's condition | 'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

'संपलं..टाटा..बाय बाय...!' कतरिना कैफची अवस्था पाहून पती विकी कौशलने दिली अशी रिअ‍ॅक्शन

googlenewsNext

हॅलोविनचा दिवस नुकताच पार पडला. हॅलोविन पार्टीला कतरिना कैफ (Katrina Kaif) गेली होती. त्यासाठी कोणतीही कसर न ठेवण्यासाठी कतरिनाने डीसी कॉमिक्समधील हार्ले क्विनचा अवतार धारण केला आहे. तिच्या या गेटअपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इतकेच नाही तर तिच्या या फोटोशूटवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. दरम्यान तिच्या या फोटोंवर तिचा नवरा विकी कौशल(Vicky Kaushal)नेही कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कतरिना कैफने हॅलोविनसाठी केलेल्या गेटअपमधील तिचे फोटो आणि या फोटोशूटचा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कतरिना कैफचा नवरा विकी कौशलनेही या फोटोंवर कमेंट केली आहे.

कमेंट करताना विक्की कौशलने टाटा, बाय बाय असे लिहिले आहे. खरेतर या फोटोशूटमधील पोझसाठी विकी कौशल कतरिनाला मदत करताना दिसतो आहे.

कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट फोन भूतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कतरिनाचा चित्रपट रिलीज होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिघेही बराच वेळ एकत्र घालवत आहेत. हॅलोविनच्या दिवशीही कतरिना कैफ सिद्धांत आणि ईशानसोबत हॅलोविन पार्टीला गेली होती.

कतरिना कैफचा नवरा विकी कौशल सोशल मीडियावर सक्रिय असतो. विकीही कतरिनाच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत असतो. विक्की कौशलने कतरिनाच्या फोटोवर कमेंट केली आहे. दोघांमधील अफाट प्रेम जे अनेकदा सोशल मीडियावर स्पष्टपणे पाहायला मिळते.

Web Title: 'Done..Tata..Bye Bye...!' Husband Vicky Kaushal's reaction after seeing Katrina Kaif's condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.