"स्वतःची ओळख गमवू नका...", मलायका अरोराने लग्नावर व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:36 IST2024-12-25T11:33:22+5:302024-12-25T11:36:23+5:30

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

"Don't lose your identity...", Malaika Arora expressed her opinion on marriage | "स्वतःची ओळख गमवू नका...", मलायका अरोराने लग्नावर व्यक्त केलं मत

"स्वतःची ओळख गमवू नका...", मलायका अरोराने लग्नावर व्यक्त केलं मत

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. घटस्फोटाचा त्रास तिला सहन करावा लागला आहे. मलायकाने अभिनेता-निर्माता अरबाज खानसोबत लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा आहे. मात्र, अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आता मलायकाने विवाहित महिलांना सल्ला दिला आहे.

कर्ली टेल्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मलायका अरोरा म्हणाली की, 'स्वतःला स्वतंत्र ठेवा बाबा. जे तुझे आहे ते तुझेच आहे, जे माझे आहे ते माझेच आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याशी लग्न करता तेव्हा तुम्ही परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करता, तिथे तुम्हाला सर्वकाही करायचे असते. पण मला वाटतं तुम्ही तुमची ओळख विसरू नये.

किमान तुम्ही तुमचे बँक खाते वाचवू शकता

ती पुढे म्हणाली की, 'तुम्ही एकत्र गोष्टी करत आहात हे चांगले आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची ओळख पूर्णपणे नष्ट करून दुसऱ्याची ओळख स्वतःची बनवता. जसे की कोणाचे तरी आडनाव घेत आहात. त्यामुळे किमान तुम्ही तुमचे बँक खाते वाचवू शकता असा माझा विश्वास आहे.

मलायका अर्जुनचे ब्रेकअप
मलायकाचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. अरबाजसोबतचा घटस्फोट खूप चर्चेत होता. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिने अर्जुन कपूरला डेट केले. दोघेही बरेच वर्षे डेट करत होते. सुरुवातीला त्यांनी हे नाते खाजगी ठेवले पण नंतर ते सार्वजनिक केले. दोघेही एकत्र दिसले. कौटुंबिक समारंभ आणि कार्यक्रमांना ते एकत्र येत असत. मात्र आता दोघांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरने नुकतेच सांगितले की तो सिंगल आहे.
 

Web Title: "Don't lose your identity...", Malaika Arora expressed her opinion on marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.