'टेंशन लेने का नहीं और...' टाटा समुहाचे चेअरमन चंद्रशेखरन यांचा रणवीरला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:32 PM2022-07-26T19:32:00+5:302022-07-26T19:46:12+5:30

IAA Leadership Awards 2022: सोमवारी मुंबईत आयोजित आयएए लीडरशिप अवॉर्ड्स 2022मध्ये रणवीर सिंग आणि एन चंद्रशेखरन यांच्यात प्रश्नोत्तराचे सत्र झाले.

'don't take tension, don't give advice' Tata Group's Chairman N Chandrasekaran's valuable advice to Ranveer Singh | 'टेंशन लेने का नहीं और...' टाटा समुहाचे चेअरमन चंद्रशेखरन यांचा रणवीरला मोलाचा सल्ला

'टेंशन लेने का नहीं और...' टाटा समुहाचे चेअरमन चंद्रशेखरन यांचा रणवीरला मोलाचा सल्ला

googlenewsNext

Ranveer Singh:बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे (Nude Photoshoot) सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी त्याच्यावर मुंबईत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा आरोप आहे. दरम्यान, टाटा समूहाचे (Tata Group) चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी रणवीर सिंगला एक मोठा सल्ला दिला आहे.

पुरस्कार सोहळ्यात आले एकत्र
सोमवारी मुंबईत आयोजित आयएए लीडरशिप अवॉर्ड्स 2022मध्ये मार्केटिंग, जाहिरात आणि मीडिया क्षेत्रातील दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. समारंभात प्रश्नोत्तराचे सत्र घेण्यात आले. यावेळी रणवीर सिंग आणि टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन समोरासमोर आले.

रणवीरने चंद्रशेखरन यांचा सल्ला 
या प्रश्नोत्तराच्या सत्रात रणवीर सिंगने चंद्रशेखरन यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी रणवीरने वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचेही मान्य केले. यावेळी टाटा सन्सच्या अध्यक्षांनी रणवीरला आयुष्याचा एक मोठा धडा दिला. चंद्रशेखरन रणवीरला म्हणाले, 'टेन्शन घेऊ नको, ज्ञान देऊ नको.' यावेळी चंद्रशेखरन यांनी रणवीरच्या प्रचंड उर्जेबद्दल कौतुकही केले. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

चंद्रशेखरन यांना बिझनेस लीडर अवॉर्ड
या पुरस्कार सोहळ्यात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर अभिनेता रणवीर सिंगला ब्रँड एंडोर्सर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान एका फायरसाइड चॅटमध्ये, चंद्रशेखरन यांनी टाटा समूहातील नेतृत्वापासून ते रतन टाटा यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींपर्यंतचे त्यांचे अनुभवदेखील शेअर केले.

Web Title: 'don't take tension, don't give advice' Tata Group's Chairman N Chandrasekaran's valuable advice to Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.