घट्ट मैत्रीची कथा सांगणारा चित्रपट 'दोस्ती जिंदाबाद'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:55 IST2019-11-11T18:55:11+5:302019-11-11T18:55:42+5:30
"दोस्ती जिंदाबाद" चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

घट्ट मैत्रीची कथा सांगणारा चित्रपट 'दोस्ती जिंदाबाद'
बॉलिवुड दिग्दर्शक पार्थो घोष यांचा आगामी चित्रपट "दोस्ती जिंदाबाद" येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा विनोदी चित्रपट असून मैत्रीवर आधारित जे चित्रपट बॉलीवूडमध्ये बनतात, त्यापेक्षा हा काहीसा वेगळा चित्रपट आहे. मैत्रीची नवी व्याख्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे निर्माते आणि लेखक आशिष महेश्वरी यांनी सांगितले की हा तरुणांना केंद्रस्थानी ठेऊन तयार केलेला चित्रपट असून आजच्या युवापिढीला आपलासा वाटेल.१०० डेज, कोहरा, अग्निसाक्षी, गुलाम –ए-मुस्तफा, युगपुरुष यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक पार्थो घोष यांनी ही या चित्रपटाची गोष्ट ऐकून लगेचच चित्रपटाला होकार दिला. युवा पिढीचा असला तरी संपूर्ण कुटुंब एकत्र पाहू शकेल असा हा चित्रपट आहे. श्रेया सिने वीजन निर्मित या चित्रपटाचे निर्माते शैलेश महेश्वरी, श्रुति महेश्वरी आणि आशीष महेश्वरी आहेत. चित्रपटाचीची कथा आशीष महेश्वरी याची असून लेखन सोहेल अख्तर यांचे आहे.
चित्रपटात देव शर्मा, साक्षी मैगो, अब्बास खान, सबीहा अत्तरवाला, राहुल चौधरी, अपूर्वा नैन, शक्ति कपूर, मोहन जोशी, किरण कुमार, राजीव निगम, एहसान खान, पप्पू पॉलिस्टर आणि श्रद्धा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. संगीत सचिन आंनद आणि बिस्वजीत भट्टाचार्य यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जोजो खान आणि छायाचित्रण अकरम खान यांचे आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लखनौ येथे करण्यात आले असून बिग कर्टेंस मीडिया प्राइवेट लिमिटेडचे शकील हाशमी चित्रपट रिलीज करत आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने लखनौ मधल्या अनेक भव्य स्थळांचे दर्शन पहिल्यांदाच चित्रपटात पाहायला मिळणार आहे.