'ड्रामा क्वीन’ सोफिया हयातचा नवा कारनामा,म्हणाली बाळ गमावल्यामुळे शरीराची झाली अशी अवस्था!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 09:01 AM2018-05-19T09:01:53+5:302018-05-19T14:31:53+5:30
सोफिया हयात कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असते.मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं.रोज काही ना काही कारनामे ...
स फिया हयात कायमच या ना त्या कारणानं चर्चेत असते.मग ते बोल्डनेस असो किंवा वादग्रस्त विधानं.रोज काही ना काही कारनामे करत सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते.कधी काळी तर तिने चक्क नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करत अध्यात्मकडे वळल्याचेही नाटक केले.सोफिया स्वतःला मनोरंजन आणि झगमगाटाच्या या दुनियेपासून दूर घेऊन गेली असेही त्यावेळी सा-यांना वाटले.इतकेच नव्हे तर मॉडेलिंग विश्वातून बाहेर पडून सोफिया नन बनल्यामुळे तिच्यावर तुफान टीकेची झोड उठली होती. रिलेशनशिपमध्ये सहन केलेला विश्वासघात, अत्याचार आणि दहशत यामुळे तिने नन होण्याचा निर्णय घेतला होता. पण काहीच दिवसांत तिने तिचा निर्णय बदल तिने दहा वर्षे लहान ब्लाद स्टॅनेस्कूसोबत लग्न केले. व्लाड स्टॅनेस्कू हा रोमानियामधला एक इंटेरियर डिझायनर आहे.लग्न केल्यानंतर सोफियाने तर सा-याच मर्यांदा ओलांडल्याचे पाहायला मिळाले.तिने सोशल मीडियावर पतीसोबतचा एक व्हीडीओ शेअर करत आपण पतीसोबत मिळून लोकांना लैंगिक शिक्षण देणार असेही म्हटले होते.एकंदर काय तर, आपल्या या वादग्रस्त कारनाम्यांमुळे चर्चेत राहणे हाच फंडा तिने आजमवला होता.आता पुन्हा तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे.स्वतः सोफियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्भपाताचे दुःख व्यक्त करत एक फोटो शेअर करुन गर्भपातानंतर शरीर पुर्वीसारखे राहिले नसल्याचे सांगितले आहे. बाळाची चाहुल लागल्यापासून आणि ते गमावल्यानंतर आता शरीराचा शेप बेढप झाला असल्याचे तिने म्हटले आहे.बोल्ड अंदाज आणि स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या सोफियाने नव-यासोबतचे सगळे संबंध संपुष्टात आणल्याचे एप्रिल महिन्यात इंस्टाग्राम अकाउंटवरुन जाहिर केले होते.सोफियाने व्लाड स्टॅनेस्कूला घराच्या बाहेर काढले असून तो अतिशय वाईट व्यक्ती असल्याचे तिचे म्हणणे आहे.त्याने सोफियाशी लग्न करण्याआधी अनेक गोष्टी लपवल्या असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच तिने तिच्या पतीवर बलात्काराचा आरोप देखील लावला आहे. सोफिया तिच्या आयुष्यातील अतिशय वाईट काळातून जात आहे असे तिचे म्हणणे आहे.