आयुषमानला बर्थ डेच्या दिवशी मिळाले मोठे गिफ्ट, स्वत:चाच मोडला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:03 PM2019-09-14T13:03:47+5:302019-09-14T13:07:53+5:30
आयुषमान खुराणा आणि नुशरत भरुचा यांचा मचअवेडेट ड्रिम गर्ल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
आयुषमान खुराणा आणि नुशरत भरुचा यांचा मचअवेडेट ड्रिम गर्ल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेलर आऊट झाल्यावर फॅन्स या सिनेमाच्या रिलीजची वाट मोठ्या आतुरतेने करत होते. या सिनेमाच्या माध्यमातून लेखक राज शांडिल्य यांनी या ड्रिम गर्ल मधून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार ऑपनिंग केली आहे.
Ayushmann Khurrana versus Ayushmann Khurrana... *Day 1* biz...
— taran adarsh (@taran_adarsh) 14 September 2019
2019: #DreamGirl ₹ 10.05 cr
2018: #BadhaaiHo ₹ 7.35 cr [Thu; #Dussehra]
2019: #Article15 ₹ 5.02 cr
2017: #ShubhMangalSaavdhan ₹ 2.71 cr
2018: #AndhaDhun ₹ 2.70 cr
2017: #BareillyKiBarfi ₹ 2.42 cr#India biz.
ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, आयुषमान खुराणाच्या ड्रिम गर्ल सिनेमाने पहिल्याच दिवशी 10.5 कोटींची ओपनिंग केली आहे. याच बरोबर आयुषमानच्या आतपर्यंतच्या करिअरमधील हा सिनेमा बिगेस्ट ओपनिंग ठरला आहे. त्याने आपल्याच सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे.
ड्रिम गर्ल सिनेमात आयुषमानने यात करम नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. एक दिवस अचानक करमला मुलींच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी लागते आणि कथा 90 अंश सेलिअल्सने फिरते. नोकरीत अट फक्त एवढीच असते की करमने पूजा बनून लोकांशी फोनवर संवाद साधायचा. ही गोष्ट करमाचा मित्र स्माईलीला माहिती असते.हळूहळू पूजाच्या आवाजाच्या प्रेमात लोक पडू लागतात एवढेच नाही तर तिच्यासोबत अनेकांना लग्न करायचे असते.
आयुषमानच्या अभिनयाबाबत बोलायचे झाल तर पुन्हा एकदा करमच्या भूमिकेत आपली छाप सोडली आहे. शुभ मंगल सावधान, बरेली की बर्फी, बधाई हो, अंधाधुन, आर्टिकल 15 आणि आता ड्रिम गर्ल हे सिनेमा पाहता आयुषमान स्क्रिप्ट बघूनच सिनेमा निवडतो हे स्पष्ट होते. त्याच्या सिनेमाची कथाच हिरो असते आणि त्याला तो त्याच्या अभिनयाने चारचांद लावतो.