'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठकने आणि शिवालिकाच्या लग्नातील व्हिडीओ आला समोर, See Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 01:37 PM2023-02-17T13:37:02+5:302023-02-17T13:38:02+5:30
या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अजय देवगण, कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा, विद्युत जामवल, सनी सिंह, भूषण कुमार असे सगळे बॉलिवूडचे दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते.
ब्लॉकबस्टर चित्रपट 'दृश्यम 2' दिग्दर्शक अभिषेक पाठक(Abhishek Pathak) आणि त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांचा गोव्यात 9 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली. नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ देखील शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अभिषेक -शिवालिकाने लग्नाचा व्हिडिओ केला शेअर
व्हिडिओमध्ये, अभिषेक पाठक व्हाईट शेरवानीमध्ये डॅशिंग दिसत आहे, तर शिवालिका पारंपारिक लाल लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे कपल लग्नादरम्यान मस्ती करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि किस करताना दिसतायेत. अभिषेक आणि शिवालिकाच्या लग्नाचा व्हिडिओ एखाद्या स्वप्नापेक्षा कमी वाटत नाही.
24 जुलैला शिवालिकाच्या वाढदिवशी या कपलने साखरपुडा केला होता. ९ फेब्रुवारीला दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो अभिषेक व शिवालिकाने शेअर केले आहेत. दोघंही नववधू-वराच्या पोशाखात कमालीचे सुंदर दिसत आहेत. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अजय देवगण, कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा, विद्युत जामवल, सनी सिंह, भूषण कुमार असे सगळे बॉलिवूडचे दिग्गज या लग्नात सहभागी झाले होते.
अशी सुरू झाली होती लव्हस्टोरी...
शिवालिकाने एका चॅट शोमध्ये आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, मी खुदा हाफिज या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. अभिषेकला भेटण्याआधी मी त्याचे वडील कुमार मंगत पाठक यांना भेटले होतं. नंतर अभिषेकशी भेट झाली. आमचे खूप कॉमन फ्रेन्ड असल्याचं आम्हाला कळलं. हळूहळू आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि यानंतर आम्ही कधी प्रेमात पडलो ते कळलंच नाही. अभिषेकने तुर्कस्थानमध्ये शिवालिकाला प्रपोज केलं होतं.
शिवालिकाने ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर 2014 साली आपलं फिल्मी करिअर सुरू केलं. किक या चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. 2019 मध्ये तिला ये साली आशिकी या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. खुदा हाफिजमध्ये ती लीड रोलमध्ये झळकली. अभिषक पाठक याने 'दृश्यम 2' दिग्दर्शित केला.