Drishyam 2 Box Office Collection: 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:03 PM2022-11-28T13:03:42+5:302022-11-28T13:53:31+5:30

Drishyam 2 Box Office: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे.

Drishyam 2 second weekend box office collection cross 38 crore | Drishyam 2 Box Office Collection: 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

Drishyam 2 Box Office Collection: 'दृश्यम 2' नं दुसऱ्या वीकेंडला केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

googlenewsNext

Drishyam 2 Box Office: अजय देवगण (Ajay Devgn) चा 'दृश्यम 2' सध्या चर्चेचा विषय आहे. बॉक्स ऑफिसवर 'दृश्यम 2'चे कलेक्शन दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. रिलीजच्या 10 व्या दिवशीही 'दृश्यम 2' ने आपल्या दमदार कमाईने सर्वांना थक्कीत केलं आहं. दुसऱ्या वीकेंडला 'दृश्यम 2' नं जबरदस्त कमाई केली आहे. 

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच चित्रपट सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धूम करतोय. अजय देवगणचा हा चित्रपट रिलीजच्या 10व्या दिवशी धमाकेदार कलेक्शन करून यावर्षीच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीत सामील होणार आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, रिलीजच्या 10 व्या दिवशी 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 17.32 कोटींचा गल्ला जमवला आहे. याचबरोबर या चित्रपटाची एकूण कमाई 143 कोटींवर पोहोचली आहे.

'दृश्यम 2'चा हा कलेक्शन दुसऱ्या आठवड्यातील सर्वाधिक आहे. यासोबतच दुसऱ्या वीकेंडला 'दृश्यम 2'चे एकूण कलेक्शन 38 कोटी इतके झाले आहे. 'दृश्यम 2' ने गेल्या तीन दिवसांत ज्या पद्धतीने कमाई केली आहे, त्यावरून हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज आहे.

‘भुल भुलय्या’ला मागे टाकलं
अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमाईच्या बाबतीत यावर्षीचा सुपरहिट सिनेमा ‘भुल भुलय्या’ला मागे टाकलं आहे. कार्तिक आर्यनच्या भुल भुलय्याने पहिल्या आठवड्यात 92.05 कोटींची कमाई केली होती. ‘दृश्यम 2’ने पहिल्या आठवड्यात 100 कोटींचा पल्ला गाठला.

Web Title: Drishyam 2 second weekend box office collection cross 38 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.