सुपरहीट 'दृष्यम'चा हॉलिवूडमध्ये डंका; इंग्लिशसह 'या' भाषांमध्ये बनणार रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:08 PM2024-02-29T19:08:14+5:302024-02-29T19:10:04+5:30
Drishyam: भारत आणि चीनमध्ये सुपरहीट झाल्यानंतर आता 'दृष्यम' जागतिक स्तरावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे.
Drishyam Hollywood Remake: अभिनेता अजय देवगणच्या 'दृष्यम'ची बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये गणना केली जाते. गेल्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग आला आणि तोही सुपरहिट ठरला. आता 2024 मध्ये दृश्यमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. भारतानंतर आता हा ही कल्ट फ्रँचायझी जागतिक स्तरावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होणार आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे ट्रॅकर श्रीधर पिल्लई यांनी आपल्या ट्विटमध्ये ही माहिती दिली.
श्रीधर पिल्लई यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, दृश्यम चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये थ्रिलर फ्रँचायझीचा कोरियन रिमेक जाहीर केल्यानंतर, पॅनोरमा स्टुडिओने आता गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जोट फिल्म्ससोबत हॉलिवूडमध्ये 'दृष्यम' बनवण्यासाठी करार केला आहे.
#PanoramaStudios takes the #Drishyam Franchise to #Hollywood!
— Sreedhar Pillai (@sri50) February 29, 2024
The cult franchise #Drishyam is all set to go global after garnering massive success in the India and China markets. Producers Kumar Mangat Pathak and Panorama Studios have joined hands with Gulfstream Pictures and… pic.twitter.com/7Kj2Ui1GSX
दरम्यान, गल्फस्ट्रीम पिक्चर्सचे सह-संस्थापक माइक कर्ज आणि बिल बिंडले आहेत. गल्फस्ट्रीम पिक्चर्सने अनेक सुपरहिट रोमँटिक कॉमेडी हॉलिवूडपट बनवले आहेत. यापैकी एक 'ब्लेंडेड', ज्यात ॲडम सँडलर आणि ड्रू बॅरीमोर यांच्यासोबत कॅमिला मेंडिस मुख्य भूमिकेत आहे. तर JOAT फिल्म्स इंटर स्टेट स्थानिक भाषेतील रिमेकमध्ये माहिर आहेत.
अनेक भाषांमध्ये चित्रपट बनणार
पॅनोरमा स्टुडिओने दृष्यम 1 आणि 2 च्या मूळ निर्मात्यांकडून चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे आता दृष्यम चित्रपट अमेरिका आणि कोरिया व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये बनवता येणार आहे. याशिवाय लवकरच या चित्रपटाच्या स्पॅनिश व्हर्जनसाठीही करार केला जाणार आहे. पॅनोरमा स्टुडिओचे व्यवस्थापकीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुमार मनोज पाठक यांनीही दृष्यम फ्रँचायझीच्या यशाबद्दल ट्विटरवरुन माहिती दिली.
इतक्या भाषांमध्ये रिमेक
हा चित्रपट मूळ मल्याळम भाषेत तयार झाला होता. यानंतर चित्रपटाच्या हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, सिंहली आणि चिनी भाषांसह अनेक भाषांमध्ये यशस्वी रिमेक झाले. आता हा हॉलिवूडवर आपली छाप सोडायला तयार आहे.