मुलाच्या निधनामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते ‘हे’ दांपत्य; जीवनयात्रा संपविण्याचा केला होता विचार !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2018 04:12 PM2018-06-10T16:12:08+5:302018-06-10T21:42:08+5:30

चित्रपटांबरोबर बºयाचशा टीव्ही मालिका शोजमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखविणारा अभिनेता शेखर सुमन सध्या ‘सात फेरों की हेरा फेरी’ या ...

Due to the death of a child, he went into depression; Think of life was done to end! | मुलाच्या निधनामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते ‘हे’ दांपत्य; जीवनयात्रा संपविण्याचा केला होता विचार !

मुलाच्या निधनामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते ‘हे’ दांपत्य; जीवनयात्रा संपविण्याचा केला होता विचार !

googlenewsNext
त्रपटांबरोबर बºयाचशा टीव्ही मालिका शोजमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखविणारा अभिनेता शेखर सुमन सध्या ‘सात फेरों की हेरा फेरी’ या टीव्ही शोमध्ये बघावयास मिळत आहे. आपल्या विनोदी स्वभावाने सर्वांची मने जिंकणाºया शेखर सुमनच्या आयुष्यात एक वेळ असाही आला होता, जेव्हा तो त्याच्या मुलाच्या विरहात डिप्रेशनमध्ये गेला होता. तो आणि त्याची पत्नी अलका इतके डिप्रेशनमध्ये गेले होते की, त्यांनी स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु दोघांनी एकमेकांना सावरत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 

ही गोष्ट ८० च्या दशकातील आहे. शेखर सुमन आणि अलका दोघेही दिल्लीच्या विद्यापीठात शिक्षण घेत होते. दोघांची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. शेखरने एका मुलाखतीत सांगितले होते की, अलकाला बघताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. कारण अलकात असे काही तरी होते, ज्यामुळे मी तिच्याकडे आपोआपच आकर्षित होत गेलो. तर अलकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, शेखरला बघताच मला असे वाटले की, ही तीच व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत मला आयुष्य व्यतीत करायचे आहे. पुढे दोघांमध्ये अगोदर मैत्री अन् नंतर हळूहळू प्रेमसंबंध फुलत गेले. 



काही काळ एकमेकांना डेटिंग केल्यानंतर दोघांनी त्यांच्यातील नात्याविषयी आपल्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनीदेखील त्यास कुठलाही विरोध न करता लगेचच हिरवा कंदील दाखविला. तसेच दोघांच्याही परिवाराची इच्छा होती की, त्यांनी लवकरात लवकर लग्न करावे. यावेळी अलका फॅशन डिझायनर म्हणून काम करीत होती. तर शेखर श्रीराम सेंटरमध्ये जॉब करीत होता. त्यावेळी त्याला सहाशे रुपये पगार होता. दोघांनी ४ मे १९८३ रोजी लग्न केले. पुढे या दांपत्याला आयुष आणि अध्ययन नावाचे दोन गोंडस मुले झाली. 

शेखरने एका मुलाखतीत सांगितले होते की, आयुषच्या निधनानंतर बराच काळ आम्ही डिप्रेशनमध्ये होतो. १९८८ मध्ये अध्ययन या दुसºया मुलाचा जन्म झाला. पुढे शेखरला ‘देख भाई देख’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ही मालिका त्यावेळी खूपच लोकप्रिय झाली. ज्यामुळे शेखरला इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली. लोकांना शेखरचे काम आवडू लागले. तसेच अलकाही लहान मुलगा अध्ययनवर फोकस करू लागली. अलकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही गेल्या तीस वर्षांपासून एकत्र आहोत. आयुष्यात दोघांनीही अनेक चढउतार बघितले आहेत; परंतु अशातही आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. आम्ही दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे समर्थक आहोत. 



दरम्यान, शेखरचा मोठा मुलगा आयुषचे निधन हृदयाच्या एका दुर्धर आजारामुळे झाले. शेखरने आयुषला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. आजही शेखर आयुषची आठवण काढताच भावुक होतो. 

Web Title: Due to the death of a child, he went into depression; Think of life was done to end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.