बॉलिवडच्या 'चांदनी'च्या निधनामुळे करण जोहरला 'सदमा','शिद्दत' सिनेमा अनिश्चित काळासाठी टाकला लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 08:35 AM2018-03-03T08:35:38+5:302018-03-03T14:05:38+5:30
बॉलिवूडची 'चांदनी' अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला आहे.बोनी कपूर यांच्या भाच्याच्या दुबईला लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी ...
ब लिवूडची 'चांदनी' अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला आहे.बोनी कपूर यांच्या भाच्याच्या दुबईला लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा हॉटेलच्या बाथरुमधील बाथटबमध्ये पडून मृत्यू झाला होता.हिंदी चित्रपटसृष्टीची रुप की रानी आणि पहिली महिला सुपरस्टार असणा-या श्रीदेवी यांची ही एक्झिट चटका लावून जाणारी होती.श्रीदेवी यांची रुपेरी पडद्यावरील अखेरची झलक आनंद एल. राय यांच्या 'झीरो' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.या सिनेमात श्रीदेवी यांच्यासह किंग खान शाहरुख,अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.श्रीदेवी यांच्या निधनामुळे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरलाही जबर धक्का बसला आहे.त्यामुळेच याचा परिणाम करणच्या सिनेमावरही दिसून येत आहे.करणने त्याच्या आगामी 'शिद्दत' या सिनेमाचं शूटिंग अनिश्चित काळासाठी थांबवलं आहे.करण जोहरचा 'शिद्दत' हा सिनेमा त्याच्या महत्त्वाकांक्षी सिनेमांपैकी एक मानला जात होता.शिद्दत या सिनेमात अभिनेत्री श्रीदेवी झळकणार होत्या.तसंच या सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवी आणि संजय दत्त ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येणार होती.याआधी 'गुमराह' सिनेमात श्रीदेवी आणि संजय दत्त यांनी एकत्र भूमिका साकारली होती.आता करणच्या शिद्दत या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे करणनं ठरवलं होते.याशिवाय या सिनेमात आलिया भट्टसुद्धा झळकणार होती.मात्र करणने हा सिनेमा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे.करण जोहर हा श्रीदेवी आणि कपूर कुटुंबीयांचा निकटवर्तीय मानला जातो.कपूर कुटुंबीयांशी करणचे चांगले संबंध आहे.श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी येताच जान्हवी आणि खुशी यांना धीर देण्यासाठी पोहचणा-यांमध्ये करण आघाडीवर होता.याशिवाय दुबईत मोहित मारवाच्या लग्नातसुद्धा करण श्रीदेवीसह थिरकतानाचा व्हिडीओ समोर आला होता.त्यामुळे श्रीदेवी यांच्या निधनामुळे करणला धक्का बसणं स्वाभाविक असल्याचे बोललं जात आहे.