शाहरुख खानच्या 'डंकी'ने रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई, जाणून घ्या आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 09:06 IST2023-12-20T08:59:08+5:302023-12-20T09:06:54+5:30
४०० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘सालार’ला १२० कोटी खर्चून बनवण्यात आलेला ‘डंकी’ तगडे आव्हान देणार आहे.

शाहरुख खानच्या 'डंकी'ने रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई, जाणून घ्या आकडा
२०२३ हे वर्ष बॉलिवूडचा किंग शाहरूख खान(Shah Rukh Khan)साठी प्रचंड कमाई करून देणारं ठरलं. त्याने ४ वर्षांनंतर असा काही कमबॅक केला की, त्याने अख्खं बॉक्स ऑफिसच हलवून सोडलं. ‘पठाण’,‘जवान’ नंतर आता त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होतोय. किंगखानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिलीजच्या या आठवड्यापूर्वीच डंकीचं अॅडव्हानस बुकिंग सुरु झालं आहे. अॅडव्हानस बुकिंगमधून या सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी'ने पहिल्याच दिवशी अॅडव्हानस बुकिंगमधून 8 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'सॅक निल्क'च्या रिपोर्टनुसार, 'डंकी'ची आत्तापर्यंत 3,37,987 तिकिट्सची विकली गेली आहेत आणि अॅडव्हानस बुकिंगमधून सिनेमाने 9.74 कोटी रुपये कमावले आहेत.
डंकीसोबतचा प्रभासच्या ‘सालार पार्ट १ - सीझफायर’ या मोस्ट अवेडेट सिनेमाचेही अॅडव्हानस बुकिंग सुरु झालं आहे. सालार २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. डंकीने अॅडव्हानस बुकिंगमधून 9.74 कोटी तर सालारने 9.41 कोटी रुपये कमावले आहेत. दोन सिनेमांमध्ये ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत सुरू झाली आहे. . केवळ २४ तासांच्या अंतराने भारतीय सिनेसृष्टीतील शाहरुख खान आणि प्रभास हे दोन बडे स्टार्स आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ४०० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘सालार’ला १२० कोटी खर्चून बनवण्यात आलेला ‘डंकी’ तगडे आव्हान देणार आहे.