कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:18 IST2023-12-19T13:08:51+5:302023-12-19T13:18:22+5:30
किंग खान शाहरुखने विकी कौशलविषयी मोठा खुलासा केला.

कतरिनाशी लग्न करुन विकी कौशलला होतोय पश्चाताप? शाहरुख खानने केला मोठा खुलासा
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत दोघेही एकमेंकावरचं प्रेम व्यक्त करण्याची कुठलही संधी सोडत नाहीत. पण, यातच किंग खान शाहरुखने विकी कौशलविषयी मोठा खुलासा केला. विकीला कतरिना कैफसोबत लग्न केल्याचा पश्चाताप होतोय, असे किंग खान म्हणाला. शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला असून तो विकी कौशलविषयी बोलताना दिसत आहे.
किंग खान शाहरुख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'डंकी'चे प्रमोशन करत आहे. राजकुमार हिराणी आणि तापसीसोबत गप्पा मारत असताना शाहरुख खानने चित्रपटातील क्लासरूम सीनच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग सांगितला. शाहरुख म्हणाला, 'लोक ब्लड ब्रदर्स होतात. मी लिंबू ब्रदर्स बनलो. आमच्यात खूप प्रेम आहे. एक-दोनदा तर विकी मला फोन करून म्हणाला, 'मी कतरिनाशी लवकर लग्न केलं. जर मी तिच्याशी लग्न केलं नसतं तर तुमच्याशी लग्न केलं असतं'. तसेच शाहरुखने विकीचे भरभरुन कौतुक केले.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. शाहरुखच्या चित्रपटाची टक्कर प्रभास स्टारर सालार या चित्रपटाशी होणार आहे. डंकीमध्ये शाहरुखशिवाय विकी कौशल, तापसी पन्नू आणि बोमन इराणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विकी आणि कतरिनाचे ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न झाले होते.