Dunki Teaser : शाहरुख खानच्या 'डंकी'ची रिलीज डेट पुढे ढकलली नाही, प्रभासच्या 'सालार'शी होणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:11 IST2023-10-14T13:11:08+5:302023-10-14T13:11:54+5:30
Dunki Teaser : 'पठाण' आणि 'जवान'च्या ब्लॉकबस्टरनंतर आता शाहरुख खानच्या पुढील चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. किंग खानचा आगामी चित्रपट 'डंकी' आहे.

Dunki Teaser : शाहरुख खानच्या 'डंकी'ची रिलीज डेट पुढे ढकलली नाही, प्रभासच्या 'सालार'शी होणार टक्कर
पठाण (Pathaan) आणि जवान(Jawan)च्या ब्लॉकबस्टरनंतर आता शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पुढील चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. किंग खानचा आगामी चित्रपट डंकी (Dunki Movie) आहे. 'डंकी' हा शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे, जो साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सालार' या चित्रपटासोबत यावर्षीच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच अशी अफवा पसरली होती की, शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार नाही. त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे, मात्र डंकीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलेली नाही, उलट चित्रपटाच्या टीझरबाबत एक मोठे अपडेट देण्यात आले आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर डंकी चित्रपटाबाबत माहिती दिली की, त्याच्या रिलीज डेटचा डेटा उपलब्ध नाही. शाहरुख खानचा हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर नियोजित तारखेला प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तरण आदर्शने असेही सांगितले आहे की डंकीचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांमधील डंकीबाबतची उत्सुकता वाढली आहे.
SRK - ‘DUNKI’ NOT POSTPONED… Yes, #Dunki is arriving on #Christmas2023… #DunkiTeaser releasing soon! #SRK#RajkumarHiranipic.twitter.com/kDShzPoRTu
— taran adarsh (@taran_adarsh) October 13, 2023
अलीकडेच काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की डंकी २०२४ पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते. खरं तर, लेट्स सिनेमाच्या अधिकृत हँडलवरील पोस्टनुसार, पोस्ट-प्रॉडक्शन टाइमलाइनमध्ये विलंब झाल्यामुळे डंकी २२ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. त्यानंतर निर्मात्यांनी डंकीबाबत अपडेट दिले. म्हणजेच डंकी २२ डिसेंबरलाच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.