"कारण तो आपला आहे", KKRमध्ये गौतम गंभीरने घरवापसी केल्यानंतर शाहरुखचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 03:49 PM2023-11-23T15:49:12+5:302023-11-23T15:51:19+5:30

गंभीर पुन्हा KKR टीमला मार्गदर्शन करणार असल्यामुळे चाहत्यांबरोबरच KKRचा मालक शाहरुख खानही खूश झाला आहे. 

dunky star shah rukh khan tweet after gautam gambhir returns to kolkata knight riders | "कारण तो आपला आहे", KKRमध्ये गौतम गंभीरने घरवापसी केल्यानंतर शाहरुखचं ट्वीट

"कारण तो आपला आहे", KKRमध्ये गौतम गंभीरने घरवापसी केल्यानंतर शाहरुखचं ट्वीट

वर्ल्डकप संपल्यानंतर क्रिकेटविश्वात आयपीएलची चर्चा सुरू झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेंटर होता. पण, आता तो कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक असणार आहे. नुकतीच गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. गंभीर पुन्हा KKR टीमला मार्गदर्शन करणार असल्यामुळे चाहत्यांबरोबरच KKRचा मालक शाहरुख खानही खूश झाला आहे. 

2011 ते 2017 या काळात गंभीर KKR कडून खेळला. या काळात केकेआर संघाने दोनदा विजेतेपद पटकावले. KKR पाच वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग T20 च्या अंतिम फेरीतही पोहोचले. त्यानंतर गंभीर लखनऊ टीमसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावत होता. त्याची घरवापसी झाल्यानंतर शाहरुखने एक ट्वीट केलं आहे. शाहरुखने त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटाच्या निमित्ताने एक्स वर Ask SRK सेशन घेतलं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शाहरुखने हटके अंदाजात उत्तरं दिली. 

या सेशनमध्ये शाहरुखला चाहत्याने गौतम गंभीरबाबत प्रश्न विचारला. "गौतम गंभीर परत आपल्या KKR टीममध्ये...काय बोलता सर", असं चाहत्याने लिहिलं होतं. चाहत्याच्या या ट्वीटला शाहरुखने उत्तर दिलं आहे. "कारण गौतम गंभीर आपला आहे. केकेआरचा कर्णधार आणि कुटुंबही आहे," असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, शाहरुख त्याच्या 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण, जवाननंतर शाहरुखच्या डंकी चित्रपटासाठी चाहते आतुर होते. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.२२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: dunky star shah rukh khan tweet after gautam gambhir returns to kolkata knight riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.