Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात
By तेजल गावडे | Updated: November 25, 2020 13:14 IST2020-11-25T13:13:49+5:302020-11-25T13:14:30+5:30
अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट 'दुर्गामती'चा ट्रेलर नुकताच भेटीला आला आहे.

Durgamati Trailer Launch: अंगावर शहारे आणणारा 'दुर्गामती'चा ट्रेलर, भूमी पेडणेकर दिसली दमदार अवतारात
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट दुर्गामतीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरसोबत अर्शद वारसी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर थ्रिलर आणि हॉररने परिपूर्ण आहे. भूमी पेडणेकप एका वेगळ्या अवतारात पहायला मिळते आहे.
भूमी पेडणेकरने दुर्गामती चित्रपटात चंचल चौहान नामक एका मुलीची भूमिका साकारली आहे. यात ती एक अपराधी असून तिला पोलीस चौकशीसाठी दुर्गामती हवेलीत घेऊन जातात. या हवेलीत पोलीस मागील ६ महिन्यात मंदिरातील १२ मूर्ती चोरी झाल्याचा तपास करत असतात. चौकशीदरम्यान चंचल चौहान एक साधारण महिलेपेक्षा वेगळ्या भूमिकेत पहायला मिळते. ती राणी दुर्गामतीच्या रुपात खूप आक्रमक दिसते. या चित्रपटात माही गिल देखील असून ती पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आहे. ती या प्रकरणाचा तपास करताना दिसणार आहे.
दुर्गामती ट्रेलरमध्ये असे बरेच सीन खूप भयावह आहेत जे अंगावर शहारे आणतात. दुर्गामतीच्या अवतारात भूमी दमदार दिसते आहे. दुर्गामती हा चित्रपट तेलगू-तमीळ चित्रपट भागमतीचा हिंदी रिमेक आहे. त्यात मुख्य भूमिकेत अनुष्का शेट्टी होती. तर हिंदी रिमेकमध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ११ डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.
भूमी पेडणेकर दुर्गामतीच्या निमित्ताने पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात दिसणार आहे. ती या चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. ती म्हणाली की, आतापर्यंत नेहमी माझ्यासोबत जबाबदारी वाटून घेण्यासाठी सहकलाकार होता पण आता या चित्रपटा मी एकटी मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी यापूर्वी कधीच अशी दिसली नाही, लोकांनी मला या अवतारात यापूर्वी कधीच पाहिलेले नाही.