शूटिंग दरम्यान आमिर खानची ही अभिनेत्री झाली होती जखमी.. मग घडले असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 07:35 AM2017-12-30T07:35:45+5:302017-12-30T13:05:45+5:30
जो जिता वही सिकंदर या आमिर खानच्या चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 25 वर्षानंतर ही आजही ...
ज जिता वही सिकंदर या आमिर खानच्या चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 25 वर्षानंतर ही आजही हा चित्रपट रसिकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटांने आमिर एक त्याचा फॅन कल्ब जमावून दिला त्यातही आमिरच्या फॅनफ्लोईंगमध्ये तरुणींची सख्या जास्त वाढली. आमिरच्या करिअरमधील बेस्ट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. या चित्रपटतील आमिरच्या अपोझिट असलेल्या आयशा झुल्काच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने रसिकांच्या मनावर वेगळी जादू केली.
नुकताच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान आयशाने सांगितले की या चित्रपटातील शूटिंग दरम्यान तिने आपले रक्त ही वाहिले होते. ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आयशाने यागोष्टीचा खुलासा केला. त्यावेळेच्या च्या काही आठवणींना उजाळा देत ती म्हणाली की, ‘मन्सूर अली खान दिग्दर्शित जो जिता वही सिकंदर’च्या क्लायमॅक्सच्या वेळचा एक दुर्दैवी घटना घडली. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये आमिर खान, दीपक तिजोरी, देवेन भोजानी या कलाकारांचा सहभाग होता.
क्लायमॅक्स शूटिंग दरम्यान स्टेडियममध्ये आएशाच्या डोक्याला खिळा लागला आणि दुखापत झाली होती. खिळा लागल्यामुळे खूप रक्त येत होते. त्यामुळे चित्रपटाची शूटिंग थांबवावी लागली. तिकडे उपस्थित सगळेजण धावपळ करत होते. आमिरने स्पॉट बॉयला ओरडत बर्फ आणण्यास सांगितला. त्यानंतर त्याने तो बर्फाचा खडा माझ्या डोक्यावर ठेवला. त्यावेळी मला माझ्याभोवती झालेली गर्दीच दिसत होती.’
त्यानंतर आयशाला रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आले. डॉक्टरांनी आयशाच्या डोक्याला टाके मारले होते. जवळपास तीन दिवस तिला आराम कराण्याचा सल्ला दिला होता. रुग्णालयात असताना जर आयशाने बोलतना ऐकले की जर ती शूटिंगला आली नाही तर समस्या होऊ शकते. त्यामुळे डोक्यावरील जखम लपवण्यासाठी आयशा लाल टोपी घालून शूटिंगला गेली आणि तिने ती पूर्ण केली. यानंतर आयशा सांगते मस्करीत तिला चिढवले जायचे या चित्रपटासाठी तिने आपल्या रक्ताचे पाणी केले.