​‘ट्यूबलाईट’च्या शोदरम्यान चित्रपटगृहांत फोडले फटाके; नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2017 07:02 AM2017-06-28T07:02:40+5:302017-06-28T12:32:40+5:30

सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ रिलीज  झालाय आणि हळूहळू बॉक्सआॅफिसवर पुढे सरकत आहे. खरे तर ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फार उजेड पाडू शकला ...

During the show of 'tubelight', the film broke out in theaters; Nine people arrested | ​‘ट्यूबलाईट’च्या शोदरम्यान चित्रपटगृहांत फोडले फटाके; नऊ जणांना अटक

​‘ट्यूबलाईट’च्या शोदरम्यान चित्रपटगृहांत फोडले फटाके; नऊ जणांना अटक

googlenewsNext
मान खानचा ‘ट्यूबलाईट’ रिलीज  झालाय आणि हळूहळू बॉक्सआॅफिसवर पुढे सरकत आहे. खरे तर ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फार उजेड पाडू शकला नाहीय. पण सलमानच्या चाहत्यांना याचे जराही सोयरसुतक नाही. मालेगावच्या एका चित्रपटगृहात घडलेल्या एका घटनेवरून तुम्ही याचा अंदाज बांधू शकता. होय, आवडत्या कलाकाराच्या पडद्यावरील एन्ट्रीसोबत टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या, नाचणे, पैसे फेकणे हे तुम्ही पाहिले वा ऐकले असेल. पण मालेगावातील या चित्रपटगृहात सलमानच्या चाहत्यांनी चक्क फटाके फोडले. चित्रपट सुरु असताना अचानक आतीषबाजी सुरु झाल्याने एकच गोंधळ उडाला. या आतीषबाजीचा व्हिडिओही काढण्यात आला.   दरम्यान चित्रपटगृहाच्या मालकाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.





‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाकडून सलमानला ब-याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाची तुलना सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’सोबत केली जात होती. रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बजरंगी भाईजान’ने १०२ कोटी रूपयांचा बिझनेस केला होता. याऊलट सर्वाधिक ५५५० स्क्रिन्सवर प्रदर्शित होऊनही रिलीजनंतरच्या तीन दिवसांत ‘ट्यूबलाईट’ला केवळ ६४ कोटींचा बिझनेस करता आला. ईदच्या मुहूर्तावर ‘ट्यूबलाईट’ पेटेल, असा अंदाज होता. पण सोमवारी ईदची सुट्टी असूनही ‘ट्यूबलाईट’ फार चमक दाखवू शकला नाही. सोमवारी या चित्रपटाने केवळ १९ कोटींचा गल्ला जमवला.

ALSO READ : SHOCKING !! सलमान खानला आहे ‘हा’ गंभीर आजार!

गत १० वर्षांतील बॉक्सआॅफिसवरील कमाईच्या बाबतीत सलमानची ही सगळ्यात खराब ईद राहिली आहे. अलीकडच्या काळात ‘प्रेम रतन धन पायो’हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सलमान खानचा सिनेमा होता. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४०.३५ कोटी कमावले होते. तर पुढचा सिनेमा ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई केली होती.  त्यातुलनेत ‘ट्यूबलाईट’ माघारला आहे. 
  

Web Title: During the show of 'tubelight', the film broke out in theaters; Nine people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.