स्ट्रगलिंग काळात कार्तिक आर्यनला 'ह्या' गोष्टीची झाली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 08:20 PM2019-03-05T20:20:00+5:302019-03-05T20:20:00+5:30
अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी' आणि 'लुका छुपी' या चित्रपटातील भूमिकेतून त्याने रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे. 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये कार्तिकने इंडस्ट्रीत येण्यासाठी त्याला किती स्ट्रगल करावा लागला आणि या काळात सर्वाधिक मदत कोणाची झाली हे त्याने सांगितले.
स्ट्रगलिंगच्या काळात कार्तिकला सोशल मीडियाची फार मदत झाल्याचे तो सांगतो. तो पुढे म्हणाला, 'अभिनेता, स्टार होण्यासाठी मला सोशल मीडियाने फार मदत केली. ऑडिशन्सबद्दल सर्च करण्यासाठी मी सतत फेसबुक आणि गुगलची मदत घ्यायचो. इंडस्ट्रीत मला कोणाबद्दलच फारशी माहिती नसल्याने सोशल मीडिया हा एकच पर्याय माझ्यासमोर होता. अॅक्टर्स हवे आहेत किंवा कास्टिंग कॉल्स असे की-वर्ड टाकून मी सर्च करत होतो. या काळात २ बीएचके फ्लॅटमध्ये १२ स्ट्रगलर्ससोबत राहत होतो.'
'लुका छुपी'नंतर कार्तिक सध्या त्याच्या आगामी 'पती पत्नी और वो' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर भूमिका साकारणार आहेत. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बी. आर. चोप्रा यांच्या 'पती पत्नी और वो'चा हा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेते संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत विद्या सिन्हा व रंजीता कौरदेखील मुख्य भूमिकेत होते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते. 'पती पत्नी और वो' चित्रपटात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे.