BREAKING: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 01:45 PM2022-04-30T13:45:37+5:302022-04-30T13:46:18+5:30
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे.
मुंबई-
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. जॅकलिनशी निगडीत जवळपास ७.२७ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार २०० कोटींच्या फसवणुकीमुळे अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याकडून मिळालेली महागडी गिफ्ट्सचा यात समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी जॅकलिनच्या ७.१२ कोटींच्या फिक्स डिपॉझिटचा समावेश आहे.
ईडीच्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरनं लोकांकडून जबरदस्तीनं वसुली केलेल्या पैशातून त्यानं जॅकलीनला आतापर्यंत ५.७१ कोटींची महागडी गिफ्ट्स दिली आहेत. इतकंच नव्हे, तर सुकेशनं जॅकलीनच्या कुटुंबीयांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची माहिती समोर आली आहे.
Enforcement Directorate (ED) has attached assets worth Rs 7.27 crores of Bollywood actor Jacqueline Fernandez, in a money laundering case involving jailed conman Sukesh Chandrashekhar. The attached property is a fixed deposit: Sources
— ANI (@ANI) April 30, 2022
(File pic) pic.twitter.com/mQEZ8rkkju
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नुकतीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील नात्याच्या बातम्या समोर आल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या होत्या. श्रीमंतांना लक्ष्य करणे, बनावट उच्चपदस्थ अधिकारी बनणे, बॉलीवूड काम नसलेल्या नसलेल्या अभिनेत्रींना भुरळ घालणारा सुकेश सध्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तुरुंगात असताना त्याने ही फसवणूक केली. या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतचा त्याचा सेल्फी आणि नोरा फतेहीसोबतच्या नात्याचीही चर्चा झाली आहे.