Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या मागे चौकशीचा फेरा, ईडीने पुन्हा बजावले समन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:47 PM2024-07-10T12:47:37+5:302024-07-10T12:48:42+5:30

सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याचं उघड झाल्यावर जॅकलिनच्या मागे चौकशीचा फेरा लागला आहे. पुन्हा

ED summons Jacqueliene Fernandez in money laundering case | Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या मागे चौकशीचा फेरा, ईडीने पुन्हा बजावले समन्स!

Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या मागे चौकशीचा फेरा, ईडीने पुन्हा बजावले समन्स!

Jacqueline Fernandez Money Laundering Case :  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सतत चर्चेत असते. गेल्या काही काळापासून जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अडचणीत सापडली असून दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.  सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याचं उघड झाल्यावर जॅकलिनच्या मागे चौकशीचा फेरा लागला आहे. पुन्हा एकदा जॅकलिनला ईडीने  (सक्तवसुली संचालनालय) मनी लॉन्ड्रींग प्रकरणात समन्स बजावले आहे.

सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आज १० जुलैला चौकशीसाठी बोलावले आहे. अभिनेत्रीला आज पुन्हा ईडीच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. याआधीही जॅकलिनची अनेकदा चौकशी झाली आहे. जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरसोबत तिचे असणारे नातेसंबंध आणि त्याच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. 

फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती सिंग यांची तब्बल २०० करोड रुपयांची फसवणूकीचं हे प्रकरण आहे. ईडीच्या आरोपांनुसार सुकेशने अनेक उच्चभ्रू लोकांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशांचा वापर जॅकलिनला महागडे गिफ्ट खरेदी करण्यासाठी केला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, जॅकलीन हिनं या संपुर्ण प्रकरणी तिच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात तिचा कोणताही सहभाग नसल्याचं जॅकलिनने सांगितलं होतं. जॅकलिन सध्या जामिनावर बाहेर आहे. याशिवाय महादेव बेटिंग ॲप प्रकरणातही जॅकलिनचं नाव समोर आलं आहे.

Web Title: ED summons Jacqueliene Fernandez in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.