करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, चर्चांदरम्यान ईशा देओलची भाच्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 01:49 PM2023-06-21T13:49:07+5:302023-06-21T14:04:21+5:30

हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींनी करण देओलच्या लग्नाला न जाणंच पसंत केलं.

eesha deol shared post and congratulates karan deol on his marriege | करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, चर्चांदरम्यान ईशा देओलची भाच्यासाठी खास पोस्ट

करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, चर्चांदरम्यान ईशा देओलची भाच्यासाठी खास पोस्ट

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) नुकताच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसह त्याने लग्नगाठ बांधली. नातवाच्या लग्नात धर्मेंद्र यांनी भांगडा करत आनंद साजरा केला. मात्र धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या दुसऱ्या पत्नी हेमामालिनी लग्नाला गेल्या नाही म्हणल्यावर एकच चर्चा झाली. हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना देओल यांनी देखील लग्नाला न जाणंच पसंत केलं. पण आता ईशाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांची बोलती बंद केली आहे.

धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी कमी वयात लग्न केले. त्यानंतर चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले. मात्र हेमा मालिनी यांनी पहिल्या कुटुंबाशी काहीही संबंध ठेवायचा नाही अशी त्यांची अट होती. त्यामुळे इतक्या वर्षात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाशी कधीच संबंध ठेवला नाही. आता धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबासाठी कालचा दिवस खूपच आनंदाचा होता. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्नबंधनात अडकला. यावेळी सुद्धा हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी लग्नाला हजेरी लावली नाही. त्यामुळे मनोरंजनविश्वात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता ईशा देओलने कपलचे अभिनंदन करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

ईशाने लिहिले, 'अभिनंदन! करण आणि द्रिशा. आयुष्यभर सोबत आणि आनंदात राहा. खूप प्रेम.'

karan deol, esha deol, esha deol wished karan deol, esha deol blesses karan and drisha, hema malini, deol family, bollywood latest news, karan deol latest news, sunny deol and esha deol, karan deol marriage

ईशा देओलने काही दिवसांपूर्वीच फादर्स डे निमित्त धर्मेंद्र एक फोटो पोस्ट केला होता. तर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काही जुने फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे ईशा, आहाना आणि सनी बॉबी हे सावत्र भाऊ बहीण देखील एकमेकांशी बोलत नाहीत. त्यांच्या या मतभेदांची चर्चा नेहमीच होत असते.

Web Title: eesha deol shared post and congratulates karan deol on his marriege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.