एक और नरेन! आता गजेन्द्र चौहान बनणार ‘पीएम’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 12:57 PM2021-03-05T12:57:03+5:302021-03-05T12:58:58+5:30
नरेंद्र मोदी यांच्यावर आणखी एक सिनेमा, घोषणा होताच ट्विटरवर ट्रेंड
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला आणखी एक सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होय, ‘एक और नरेन’ असे या सिनेमाचे नाव असून यात ‘महाभारत’ या मालिकेत युधिष्ठीरची भूमिका साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान मोदींची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहेत.
गजेंद्र चौहान यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी खूप दिवसांपासून या भूमिकेची तयारी करत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.
“एक और नरेन” फ़िल्म का एक संवाद :-
— Gajendra Chauhan (@Gajjusay) March 5, 2021
हां, मैं भीड़ में से एक हूँ
बल्कि भीड़ में ही हूँ।
आप को तो आपके लोगो ने भीड़ में से आगे लाकर आगे खड़ा कर दिया, मगर मुझे तो भीड़ ने ही आगे खड़ा कर दिया।
प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा सिनेमा दोन भागात पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका भागात स्वामी विवेकानंद यांचे कार्य दाखवले जाणार तर दुस-या भागात मोदी कशाप्रकारे विवेकानंदांच्या विचारांचे अनुकरण करतात याबाबत सांगितले जाणार आहे. मिलन भौमिक गेले वर्षभर मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर संशोधन करत होते. तूर्तास या सिनेमाच्या पटकथेवर काम सुरु आहे आणि येत्या 12 मार्चपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.
मोदी जी ने देश के लिये किया है वो आज तक किसी न किया होगा #एक_और_नरेंद्र
— Gajendra Chauhan (@Gajjusay) February 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर याआधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आला होता. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी मुख्य भूमिका साकारली होती.