Ekata Kapoor Love Story: ...तर मी पण बॉलिवूड वाईफ असले असते; त्याच्या वाढदिवशी एकता कपूरने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 21:21 IST2022-09-27T21:20:47+5:302022-09-27T21:21:35+5:30
एकता कपूरने तिच्या भावना शेअर करताना चंकीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Ekata Kapoor Love Story: ...तर मी पण बॉलिवूड वाईफ असले असते; त्याच्या वाढदिवशी एकता कपूरने व्यक्त केल्या भावना
एकता कपूरला कोण ओळखत नाही. एवढ्या गाजलेल्या टीव्ही सिरीअल तिच्याच तर असतात. हीच एकता कपूर बॉलिवूडच्या एका अभिनेत्यावर फिदा झाली होती. त्याच्याशीच लग्न करायचे होते, पण राहून गेले. एकतानेच तिच्या शब्दांत त्याच्या वाढदिनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो चंकी पांडे होता. चंकी पांडेने नुकतीच साठी ओलांडली. त्याला सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतू, एक पोस्ट खास होती, ती म्हणजे एकता कपूरची. तिच्यासह काही नट्यांनी देखील चंकी आमच्या तरुणाईच्या काळात आपले क्रश होता अशी कबुली दिली.
एकता कपूरने तिच्या भावना शेअर करताना चंकीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ''जेव्हा खूप वर्षांपूर्वी मी चंकी पांडेला पाहून लाजत होते, जर त्याने उत्तर दिले असते तर आज मी बॉलीवूड वाईफ असले असते'', असे एकताने म्हटले आहे. एकताने हे नेटफ्लिक्स रिअॅलिटी शो फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हजच्या संदर्भात लिहिले आहे, ज्यामध्ये चंकी पांडेची पत्नी भावना पांडे आघाडीच्या स्टार्सपैकी एक म्हणून दिसते. एकता कपूरप्रमाणेच फराह खाननेही चंकी पांडेबद्दल एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याबद्दलच्या तिच्या भावना शेअर केल्या आहेत.
अनन्या पांडेने तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या इंस्टाग्रामवर काही खास न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत चंकी पांडे अनन्यासोबत बीचवर पोज देताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याने अनन्याला पक़डलेले आहे. पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये तो पत्नी भावना पांडेसोबत आरशात सेल्फी घेताना दिसत आहे.