पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर प्रतिक्रिया देऊन फसली एकता कपूूर; ट्रोलर्सच्या प्रतिक्रिया वाचून तुम्हाला धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 11:53 AM2018-05-23T11:53:51+5:302018-05-23T17:24:02+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळे सध्या संपूर्ण देशात सरकारविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पेट्रोलियन पदार्थांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यानेच ...
प ट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळे सध्या संपूर्ण देशात सरकारविषयी संताप व्यक्त केला जात आहे. पेट्रोलियन पदार्थांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यानेच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली जात असल्याचे सरकारकडून स्पष्ट केले जात आहे. मात्र भाववाढीमुळे लोकांमध्ये तीव्र असा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, टीव्ही क्वीन एकता कपूरने आता वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर आपले मत मांडले आहे. ज्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकताने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा संबंध लॉँग ड्राइव्ह आणि कपल्सशी जोडला आहे. ज्यामुळे तिची ट्विटरवर सातत्याने खिल्ली उडविली जात आहे.
अभिनेत्री करिना कपूर आणि सोनम कपूरच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉँचप्रसंगी निर्माती एकता कपूर माध्यमांशी बोलत होती. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल जेव्हा एकताला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘पेट्रोलच्या किमती कितीही वाढू द्या; पण पुरुष महिलांना लॉँग ड्राइव्हवर घेऊन जाणारच. हा काही तो चित्रपट नाही, जो तुम्ही अशा स्थितीत बघणार नाहीत. त्यामुळे आता हीच वेळ आहे की, तुम्ही ड्रायव्हिंगवर कमी आणि थिएटरवर जास्त पैसे खर्च करायला हवेत.
एकताच्या या विचित्र वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. यूजर्स तिच्या या वक्तव्याला वायफळ म्हणून संबोधत आहेत. एका यूजरने तर हेदेखील लिहिले की, एकता स्टेजवर पेट्रोल पिऊन गेली होती काय? तर काही यूजर्सनी एकताच्या या वक्तव्याचा संंबंध थेट तिच्या टीव्ही शोबरोबर जोडला. दरम्यान, आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला एकता कपूर आणि रिया कपूर एकत्र प्रोड्यूस करीत आहेत. शशांक घोषच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या या चित्रपटाच्या कथा चार तरुणींवर आधारित आहे. चित्रपटात करिना कपूर-खान, सोनम कपूर-आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
}}}} ">Even if petrol prices are at its highest, men will take women for drives & in today's time, women will take men for drives. This isn't the movie that you're going to stop watching as at this time you need to spend less on driving & more in theatre: Ekta Kapoor on fuel price hike pic.twitter.com/kyhaowGHVN— ANI (@ANI) May 22, 2018
Even if petrol prices are at its highest, men will take women for drives & in today's time, women will take men for drives. This isn't the movie that you're going to stop watching as at this time you need to spend less on driving & more in theatre: Ekta Kapoor on fuel price hike pic.twitter.com/kyhaowGHVN— ANI (@ANI) May 22, 2018
अभिनेत्री करिना कपूर आणि सोनम कपूरच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉँचप्रसंगी निर्माती एकता कपूर माध्यमांशी बोलत होती. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल जेव्हा एकताला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘पेट्रोलच्या किमती कितीही वाढू द्या; पण पुरुष महिलांना लॉँग ड्राइव्हवर घेऊन जाणारच. हा काही तो चित्रपट नाही, जो तुम्ही अशा स्थितीत बघणार नाहीत. त्यामुळे आता हीच वेळ आहे की, तुम्ही ड्रायव्हिंगवर कमी आणि थिएटरवर जास्त पैसे खर्च करायला हवेत.
}}}} ">लगता है मैडम को किसी ने मिरिंडा बोल के पेट्रोल पिला दिया।
लगता है मैडम को किसी ने मिरिंडा बोल के पेट्रोल पिला दिया।— ETHAN HUNT (@hunt_bhai) May 22, 2018
लगता है मैडम को किसी ने मिरिंडा बोल के पेट्रोल पिला दिया।— ETHAN HUNT (@hunt_bhai) May 22, 2018}}}} ">— ETHAN HUNT (@hunt_bhai)
May 22, 2018एकताच्या या विचित्र वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. यूजर्स तिच्या या वक्तव्याला वायफळ म्हणून संबोधत आहेत. एका यूजरने तर हेदेखील लिहिले की, एकता स्टेजवर पेट्रोल पिऊन गेली होती काय? तर काही यूजर्सनी एकताच्या या वक्तव्याचा संंबंध थेट तिच्या टीव्ही शोबरोबर जोडला. दरम्यान, आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाला एकता कपूर आणि रिया कपूर एकत्र प्रोड्यूस करीत आहेत. शशांक घोषच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या या चित्रपटाच्या कथा चार तरुणींवर आधारित आहे. चित्रपटात करिना कपूर-खान, सोनम कपूर-आहुजा, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.