"मी अडल्ट आहे तर..." युझरच्या ट्रोलिंगवर एकता कपूरने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 09:42 AM2023-10-10T09:42:28+5:302023-10-10T09:43:18+5:30

नुकतंच एकताला नेटकऱ्याने अडल्ट सिनेमांवरुन डिवचलं. त्याला एकताने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

ekta kapoor gives straight answer to twitter user who trolled her for making adult movies | "मी अडल्ट आहे तर..." युझरच्या ट्रोलिंगवर एकता कपूरने दिलं सडेतोड उत्तर

"मी अडल्ट आहे तर..." युझरच्या ट्रोलिंगवर एकता कपूरने दिलं सडेतोड उत्तर

googlenewsNext

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) तिच्या हटके मालिकांसाठी ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून एकता वेगवेगळ्या हिंदी मालिकांची निर्मिती करत आहे. एकताच्या बहुतांश मालिका या हिटच होतात. 'क्योंकी सांस भी कभी बहु थी', 'पवित्र रिश्ता' ते सध्याच्या 'नागिन' पर्यंत तिने अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे. शिवाय तिने अनेक हिंदी चित्रपटही प्रोड्युस केले आहेत. बहुतांश सिनेमे हे अडल्ट असल्याने ती ट्रोल झाली आहे. नुकतंच एकताला नेटकऱ्याने अडल्ट सिनेमांवरुन डिवचलं. त्याला एकताने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

एकता सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. मात्र ती ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन आपल्या प्रोजेक्ट्सचे अपडेट्स देत असते. आता ती ट्विटरवर परत आली आहे. तिने काही ट्वीट केले असून नेटिझन्सच्या प्रश्नांना उत्तरंही दिली आहेत. दरम्यान एका नेटकऱ्याच्या ट्वीटने लक्ष वेधलं. युझरने ट्वीट करत लिहिले,'कृपया अडल्ट सिनेमे बनवणं बंद कर'. या ट्वीटवर एकताने रोखठोक प्रतिक्रिया देत लिहिले,'मी अडल्ट आहे तर मी अडल्ट चित्रपटच बनवणार'.

एकताने गंमतीतच अशी प्रतिक्रिया दिली असली तरी तिने नेटकऱ्याचं तोंड बंद केलंय. तिच्या या उत्तरावर इतर नेटकऱ्यांनीही मजा घेतली आहे.'तिरस्कार करणाऱ्यांचं ऐकू नको','कडक उत्तर' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत. 

एकताचा नुकताच 'ड्रीम गर्ल 2' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये आयुष्मान खुरानाने भूमिका केली आहे. तसंच 'थँक्यू फॉर कमिंग' सिनेमाचीही एकताने निर्मिती केली आहे.

Web Title: ekta kapoor gives straight answer to twitter user who trolled her for making adult movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.