एकता कपूरच्या ‘या’ अभिनेत्रीचा दुसरा पती आहे बॉलिवूडचा खतरनाक खलनायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 02:40 PM2018-05-05T14:40:03+5:302018-05-05T20:10:03+5:30

निर्माती एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत जिज्ञासाची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी कळसेकर हिला प्रेक्षक तिच्या नावापेक्षा तिच्या ...

Ekta Kapoor's actress has another husband Bollywood's dangerous villain! | एकता कपूरच्या ‘या’ अभिनेत्रीचा दुसरा पती आहे बॉलिवूडचा खतरनाक खलनायक!

एकता कपूरच्या ‘या’ अभिनेत्रीचा दुसरा पती आहे बॉलिवूडचा खतरनाक खलनायक!

googlenewsNext
र्माती एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत जिज्ञासाची मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी कळसेकर हिला प्रेक्षक तिच्या नावापेक्षा तिच्या कामावरून अधिक ओळखतात. तिने बºयाचशा बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास तिने नऊ वर्षांपूर्वी एका अशा अभिनेत्याशी दुसरे लग्न केले होते, ज्याला बॉलिवूडमध्ये खतरनाक खलनायकाच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. 



अश्विनीला आपल्या सुंदर अभिनयासाठी ‘इंडियन टेली आणि इंडियन टेलीव्हिजन सारख्या अवॉर्डने सन्मानित केले आहे. अश्विनीने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात १९९५ मध्ये ‘सीआयडी’ या मालिकेतून केली. त्यानंतर तिने ‘शक्तिमान, कसम सेल, झांसी की रानी’ यांसारख्या सुपरहिट मालिकांमध्ये काम केले. टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय शो ‘जोधा अकबर’मध्येही अश्विनीने महामंगाची अतिशय मुख्य अशी भूमिका साकारली होती. 



अश्विनीने टीव्ही व्यतिरिक्त बºयाचशा सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले. ज्यामध्ये ‘द हीरो, खाकी, आंखे, गोलमाल रिटर्न्स, सिंघम रिटर्न्स, बदलापूर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. हिंदी व्यतिरिक्त अश्विनी मराठी आणि तेलगू चित्रपटांमध्येही झळकली. तिच्या पतीबद्दल सांगायचे झाल्यास, अभिनेता मुरली शर्मा असे तिच्या पतीचे नाव आहे. मुरलीने त्याच्या बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. हिंदी चित्रपटांबरोबर तेलगू, मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्येही त्याने अशाच काहीशा भूमिका साकारल्या आहेत. 



बॉलिवूडमध्ये मुरलीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘ढोल, वजीर, जय गंगाजल, सिंघम, गोलमाल रिटर्न्स, दबंग’ या चित्रपटांमध्ये त्याचा अभिनय सरस ठरला आहे. मुरली अश्विनीचा दुसरा पती आहे. दोघांनी २००९ मध्ये लग्न  केले. याअगोदर अश्विनीने १९९८ मध्ये टीव्ही कलाकार नीतिश पांडे याच्याशी विवाह केला होता. मात्र त्यांचे लग्न केवळ चार वर्षच टीकू शकले. २००२ मध्ये हे दोघे विभक्त झाले. 

Web Title: Ekta Kapoor's actress has another husband Bollywood's dangerous villain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.