भयपटांसाठी प्रसिद्ध रामसे बंधूंवर कोसळला दु:खाचा डोंगर, कुमार रामसे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:06 PM2021-07-08T14:06:53+5:302021-07-08T14:07:57+5:30

Kumar Ramsay Passes Away : कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते.

The eldest of the Ramsay Brothers - Kumar Ramsay has died in Mumbai due to a heart attack | भयपटांसाठी प्रसिद्ध रामसे बंधूंवर कोसळला दु:खाचा डोंगर, कुमार रामसे यांचं निधन

भयपटांसाठी प्रसिद्ध रामसे बंधूंवर कोसळला दु:खाचा डोंगर, कुमार रामसे यांचं निधन

googlenewsNext
ठळक मुद्देरामसे बदर्स त्यांच्या हॉरर सिनेमांसाठी ओळखले जातात. पुराना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर सिनेमांची निर्मिती या ब्रदर्सने केली.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाच्या दु:खातून इंडस्ट्री सावरली नसताना आज बॉलिवूडवर दुसरा मोठा आघात झाला.  भयपटांचे अर्थात हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणा-या रामसे बंधुंपैकी ( Ramsay Brothers) कुमार रामसे  (Kumar Ramsay ) यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी तसेच राज, गोपाल व सुनील अशी तीन मुलं आहेत.
  कुमार यांचा मोठा मुलगा गोपाळ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कुमार रामसे यांचे निधन झाले. 

कुमार रामसे हे चित्रपट निर्माते एफ यू रामसे यांचा पुत्र होते. कुमार आपल्या सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश होता. 2019 मध्ये श्याम रामसे यांचे निधन झाले होते. 

रामसे बदर्स त्यांच्या हॉरर सिनेमांसाठी ओळखले जातात. पुराना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर सिनेमांची निर्मिती या ब्रदर्सने केली. काळ रोमॅन्टिक चित्रपटांचा होता. मात्र रामसे बंधुंनी हॉरर सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावले होते.  और कौन आणि दहशत या चित्रपटांची निर्मिती कुमार रामसे यांनी केली होती. रामसे ब्रदर्सच्या बहुतेक चित्रपटांची स्क्रिप्ट लिहिण्यात त्यांचे मोठे योगदान होते.

 

Web Title: The eldest of the Ramsay Brothers - Kumar Ramsay has died in Mumbai due to a heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.