निवडणूक आयोगाचा झटका; मतदार यादीतून वगळले प्रियंका चोपडा अन् तिच्या आईचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 03:31 PM2017-11-08T15:31:49+5:302017-11-08T21:01:49+5:30
बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, सध्या उत्तर प्रदेशात ...
ब लिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखविणारी देसी गर्ल प्रियंका चोपडा हिच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, सध्या उत्तर प्रदेशात नगरपालिकांच्या निवडणुका होत असून, जोरदार तयारी केली जात आहे. याचदरम्यान सुधारित मतदारयाद्या तयार करण्याचेही काम सुरू आहे. अशात एक बातमी समोर येत आहे की, अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि तिची आई मधू चोपडा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. बरेली नगरपालिकेच्या यादीतून या दोघींचे नाव वगळण्यात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे.
आॅनलाइन वृत्तानुसार, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, ही कारवाई एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तक्रारीनुसार प्रियंकाचा परिवार गेल्या १७ वर्षांपासून या भागात फिरकलासुद्धा नाही. ते मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी जणूकाही हा परिसर कायमचा सोडला आहे. अशात त्यांना या भागात मतदानाचा हक्क का द्यावा? असा प्रश्न उपस्थित करीत या माय-लेकीचे नाव वगळण्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाºयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या दोघींचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईत राहात असतानाही प्रियंका आणि तिची आई मधू यांचे बरेली मतदारसंघात मतदार म्हणून नाव होते. परंतु तक्रारीनंतर हे नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान, प्रियंका सध्या न्यूयॉर्कला असून, त्याठिकाणीदेखील गेल्या काही आठवड्यांपासून आपल्यासाठी एक आशियाना शोधत आहे. सूत्रानुसार तिने एक घर पसंत केले असून, लवकरच त्या ठिकाणी तिच्या मालकीचे हे घर होणार आहे. प्रियंकाने ‘क्वाटिको’ या शोमधून हॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सध्या ती दोन ते तीन हॉलिवूडपटांमध्ये कामही करीत आहे. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून ती एकाही बॉलिवूडपटात झळकली नाही.