एली अवरामचं Ice Skating बघून रेमो डिसुझाही झाला थक्क, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 16:02 IST2023-12-30T16:02:00+5:302023-12-30T16:02:59+5:30
एली अवरामच्या बॅलेन्स आणि फ्लेक्झिबिलिटीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय

एली अवरामचं Ice Skating बघून रेमो डिसुझाही झाला थक्क, Video व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम (Elli Avram) मूळची स्वीडिश ग्रीक अभिनेत्री आहे. 'किस किस को प्यार करुं' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एली सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 8 मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकतंच एलीने Ice skating करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती अगदी प्रोफेशनल असल्यासारखीच स्केटिंग करताना दिसत आहे. एलीचं हे टॅलेंट पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे.
एली अवरामच्या बॅलेन्स आणि फ्लेक्झिबिलिटीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. इतक्या तरबेजरित्या ती Ice skating सारखा अवघड टास्क करताना दिसत आहे. शिवाय ती जे एक्सप्रेशन्स देतेय ते सुद्धा शोभून दिसणारे आहेत. हा अॅक्ट कोणत्याही सिनेमातील सीनपेक्षाही कठीण दिसतोय. यासाठी तिने स्वत: किती मेहनत घेतली असेल याची कल्पना करु शकतो. 'बॉडी डबल नाही तर मी स्वत: आइस स्केटिंग करताना. एक दिवस फिगर स्केटिंग गर्लची भूमिका साकारायला मिळावी हे माझं स्वप्न आहे. पॅशन खरं आहे.' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
एलीच्या या व्हिडिओवर सेलिब्रिटी डान्स कोरिओग्राफर रेमो डिसुझानेही wow अशी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर फातिमा सना शेख, शांतनु माहेश्वरी, आयुष्मान खुराना, अली फजल, धर्मेशनेही कमेंट केली आहे. तर इतर चाहत्यांनीही तिची स्तुती केली आहे.