'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:40 IST2024-11-01T13:39:21+5:302024-11-01T13:40:34+5:30
श्रेयसला पहिल्यांदा कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची ऑफर आली तेव्हा काय घडलं याचा किस्सा श्रेयसने सांगितलाय (kangana ranaut)

'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
अभिनेता श्रेयस तळपदे हा सर्वांचा आवडता अभिनेता. श्रेयसला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंंय. श्रेयसने मराठी मनोरंजन विश्वासोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख कमावलीय. 'इक्बाल' आणि 'ओम शांती ओम' पासून सुरु झालेला श्रेयसचा प्रवास आता यशाच्या शिखरावर पोहोचलाय. श्रेयस लवकरच आपल्याला 'इमर्जन्सी सिनेमात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमासाठी श्रेयस कंगनाला पहिल्यांदा भेटला तेव्हा काय घडलं याचा खुलासा त्याने केलाय.
कंगनाच्या इमर्जन्सीची ऑफर मिळाल्यावर श्रेयस काय म्हणाला?
अमोल परचुरेंच्या कॅचअप या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, "कंगना मॅमचा फोन आला की मी अशी एक फिल्म करतेय. मला त्यासंदर्भात बोलायचंय तर आपण कधी भेटू शकतो. मी भेटायला गेल्यावर त्या म्हणाल्या की सिनेमात अटलजींचा असा एक रोल आहे. अटलजींचं नाव सांगितल्यावर मी २ मिनिटं जरा थांबलो.
मग मला अजूनही आठवतंय मी त्यांना पहिला प्रश्न विचारला होता की, "सॉरी मी तुम्हाला हे विचारतोय पण मला क्लीअर आणि पारदर्शी राहायचंय. ही प्रोपोगंडा फिल्म असणारेय का?" यावर कंगना हसली आणि म्हणाली, "ही स्क्रीप्ट आहे. तुम्ही स्क्रीप्ट वाचा. जशी स्क्रीप्ट आहे तशी फिल्म होणारेय. तुम्हाला कुठेही असं वाटलं की ही प्रोपोगंडा फिल्म आहे तर मला सांगा की, सॉरी कंगना मी हे नाही करु शकत."
कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची उत्सुकता
अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 'इमर्जन्सी' सिनेमा ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण, सेन्सॉर प्रमाणपत्रच नसल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. अखेर वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहल्यानं हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं. दरम्यान, सेन्सॉरकडून या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला. काही दिवसांतच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.