थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळालेला 'इमर्जन्सी' ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:00 IST2025-01-22T18:00:05+5:302025-01-22T18:00:36+5:30
'इमर्जन्सी' सिनेमा कधी अन् कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या सविस्तर (emergency)

थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळालेला 'इमर्जन्सी' ओटीटीवर रिलीज होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार
'इमर्जन्सी' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेच सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शिका कंगना राणौतने 'इमर्जन्सी' सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये रिलीज करण्याची योजना आखली आहे. 'इमर्जन्सी' कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार, याची प्राथमिक माहिती समोर आलीय. जाणून घ्या.
कंगनाचा 'इमर्जन्सी' कोणत्या ओटीटीवर बघाल?
कंगना राणौतची प्रमुख भूमिका असलेला 'इमर्जन्सी' सिनेमाच्या ओटीटी रिलीजबद्दल अपडेट समोर आलीय. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट अजून निश्चित झाली नसली तरी येत्या ३० ते ३५ दिवसांमध्ये 'इमर्जन्सी' ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. याविषयी अधिकृत माहिती अजून समोर आली नाहीये. परंतु थिएटरमध्ये मिळणारा प्रतिसाद बघता 'इमर्जन्सी' पुढील काही दिवसांमध्ये प्रदर्शित होईल.
'इमर्जन्सी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाने १२ कोटींची कमाई केलीय. ही कमाई संपूर्ण भारतातील आहे. 'इमर्जन्सी' रिलीज होऊन आता एक आठवडा होईल. पण ही कमाई अजून कमीच म्हणावी लागेल. 'इमर्जन्सी' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं तर या सिनेमात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. तसेच या सिनेमात श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, मिलिंद सोमण या कलाकारांनी भूमिका साकारलीय