Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 01:36 PM2024-07-15T13:36:57+5:302024-07-15T13:37:23+5:30

सिनेमाच्या सेटवर सलमान खान हा कायम उशिरा येतो ? इमरान हाश्मी म्हणाला...

Emraan Hashmi reacts to rumors of Salman Khan reaching late on set says Salman Khan has his own schedule | Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं

Salman Khan : सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो ? इमरान हाश्मीने खरं काय ते सांगून टाकलं

बॉलिवूडप्रेमींच्या मनावर अनेक दशकं राज्य अधिराज्य करणारा अभिनेता म्हणजे सलमान खान.सलमान खानने आतापर्यंत एकापेक्षा एक आणि सुपरहिट चित्रपट दिले आहे. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. पण, सिनेमाच्या सेटवर सलमान खान हा कायम उशिरा येतो, असं बोललं जातं. यावर आता बॉलिवूडचा "सिरियल किसर" इमरान हाश्मीने प्रतिक्रिया दिली आहे. 

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान आणि बॉलिवूडचा "सिरियल किसर" इमरान हाश्मी यांनी गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३' सिनेमात एकत्र काम केलं होतं. दोघांमध्ये चांगले संबंधदेखील आहे. नुकतंच इमरान हाश्मीने लल्लनटॉपला मुलाखत दिली. यावेळी इमरानला सेटवर सलमान खान नेहमीच उशिरा येतो का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इमरान हाश्मीनं दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

इमरान हाश्मी म्हणाला, 'मी म्हणेन की त्यांचं स्वतःचं एक वेळापत्रक आहे. पण ते सर्वोत्तम लोकांपैकी एक आहेत. त्यांना मी आवडतो आणि मलाही ते खूप आवडतात. आम्ही दोघे मित्र नाही आहोत. पण, आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. शूटिंगच्या वेळी आम्ही एकत्र बसून गप्पा मारायचो, तेव्हा असं वाटायचं की एखाद्या मित्राशी बोलतोय. आम्ही दोघे वांद्रे इथं राहिलो आहोत. वांद्रेबाबत किंवा फिटनेसबाबत आम्ही एकमेकांशी गप्पा मारतो. फक्त काहीच लोकांशी आपण निवांतपणे बोलू शकतो, सलमानसोबत माझं तसंच आहे'. 

इमरान हाश्मी आणि सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्याची  'शोटाईम' ही वेबसीरिज डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित झाली. या सीरीजला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. तर सलमान खान  लवकरच 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Emraan Hashmi reacts to rumors of Salman Khan reaching late on set says Salman Khan has his own schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.