इम्रान हाश्मी का गातोय अजय देवगनचे गुणगाण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 01:14 PM2016-12-16T13:14:59+5:302016-12-16T13:14:59+5:30
बॉलीवूडचा ‘कि सिंग स्टार’ इम्रान हाश्मी इंडस्ट्रीतील एका व्यक्तीवर सध्या फारच कौतुकवर्षाव करीत आहे. आता ती व्यक्ती कोणी अभिनेत्री ...
ब लीवूडचा ‘कि सिंग स्टार’ इम्रान हाश्मी इंडस्ट्रीतील एका व्यक्तीवर सध्या फारच कौतुकवर्षाव करीत आहे. आता ती व्यक्ती कोणी अभिनेत्री नाही तर ‘शिवाय’ स्टार अजय देवगन आहे. इम्रानच्या मते, त्याने काम केलेल्या सर्व कलाकारांमध्ये अजय सर्वात चांगला को-अॅक्टर आहे.
इम्रान आणि अजय सध्या ‘बादशाहो’ चित्रपटात एकत्र काम करीत आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो शेअर केले. तो म्हणतो, ‘मी आतापर्यंत जेवढ्या लोकांसोबत काम केले त्यामध्ये मला अजय सर्वात चांगला सहकलाकार वाटतो. तो एक भन्नाट अभिनेता आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत काम करतो, दरवेळी मला त्याच्याकडून काही तरी नवीन गोष्ट शिकायला मिळते.’
दोघांनी यापूर्वी अंडरवर्ल्डवर आधारित ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मिलन लुथ्रीयांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. विशेष म्हणजे ‘बादशाहो’चे दिग्दर्शनही मिलन करतोय. चित्रपटाची जोधपूर शेड्यूल पूर्ण झाले. ‘आम्ही शूटींग दरम्यान खूप धमाल केली’, असे इम्रानने फेसबुकवर पोस्ट केले.
मग या चित्रपटातही त्याचे ‘नेहमीचे’ रुप पाहायला मिळेल का? असे विचारले असता तो म्हणतो, ‘तुम्ही फक्त अंदाज बांधा. मला माहित आहे तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. मी केवळ एवढेच सांगेन की, ‘बादशाहो’पाहून तुमची निराशा नाही होणार. आतापर्यंत जसा आमचा अनुभव आहे त्यावरून तरी मी हे ठाम सांगू शकतो.’
अजयनेसुद्धा फेसबुकवर पोस्ट करून जोधपूरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो लिहितो की, ‘खम्मा घणी. १९९९ मध्ये ‘कच्चे धागे’ सिनेमाच्या शूटींगसाठी मी जोधपूरला आलो होतो. १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा येथे येऊन खूप बरे वाटतेय.’
रजत अरोडा लिखित ‘बादशाहो’ हा अॅक्शन चित्रपट असून यामध्ये अजय-इम्रानसह इलियाना डीक्रुज, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.