शूटिंगदरम्यान Emraan Hashmiला झाली दुखापत, मानेला झालेली जखम पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:46 AM2024-10-08T11:46:33+5:302024-10-08T11:47:07+5:30
Emraan Hashmi : इमरान हाश्मीचा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला. बॉलिवूड अभिनेत्याच्या मानेला दुखापत झाली आहे.
बॉलिवूडचा सीरियल किसर अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या सेटवर त्याचा अपघात झाला असून तो जखमी झाला. यानंतर इमरान हाश्मीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. इमरान हाश्मीच्या मानेला जखम झाली आहे आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर येताच त्याचे सर्व चाहते काळजीत पडले आहेत. इमरान हाश्मीचे चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना करत आहेत.
अभिनेता इमरान हाश्मी 'गुडचारी २' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटादरम्यान इमरान हाश्मी एका ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला. त्याच्या मानेला दुखापत झाली होती. इमरान हाश्मीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याच्या मानेला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टरांकडे जाऊन त्याने उपचार घेतल्याचे समजते आहे. त्याने जखमेवर पट्टी लावलेली दिसते आहे. इमरानचे हे फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. ते अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.
आगामी प्रोजेक्ट्स
इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो बॉलिवूड व्यतिरिक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही सक्रिय आहे. इमरान हाश्मी तेलगू चित्रपट 'गुडाचारी २' मध्ये काम करत आहे. याशिवाय तो आणखी एका साऊथ सिनेमात दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इमरान हाश्मीचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटचा तो २०२३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'टायगर ३' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.