इमरान हाश्मीला ऑफर झाला होता 'आशिकी 2', स्क्रीप्ट आवडल्यानंतरही एका कारणाने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:30 AM2023-12-29T10:30:54+5:302023-12-29T10:31:52+5:30

इमरानच्या नकारानंतर आदित्य रॉय कपूरची झाली एन्ट्री

Emraan Hashmi Was Offered Aashiqui 2 Rejected For One Reason Despite Liking The Script | इमरान हाश्मीला ऑफर झाला होता 'आशिकी 2', स्क्रीप्ट आवडल्यानंतरही एका कारणाने दिला नकार

इमरान हाश्मीला ऑफर झाला होता 'आशिकी 2', स्क्रीप्ट आवडल्यानंतरही एका कारणाने दिला नकार

अभिनेता इमरान हाश्मीने (Emran Hashmi) त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. त्याचा वेगळा चाहतावर्ग आहे. 'मर्डर', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' हे त्यापैकीच काही सिनेमे आहेत. पण नुकतंच इमरान हाश्मीने खुलासा केला की त्याला २०१३ साली आलेला 'आशिकी 2' सिनेमाही ऑफर झाला होता. कोणत्या कारणाने त्याने सिनेमा नाकारला हेही त्याने स्पष्ट केलं आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत इमरान हाश्मी म्हणाला, 'मोहित सुरीने आशिकी 2 साठी सर्वात आधी मलाच पसंती दिली होती. त्याने मला तसं अप्रोचही केलं पण मी ऑफर नाकारली. कारण सिनेमाची कथा ऐकल्यावर मला असं वाटलं की हा सिनेमा एखाद्या नवोदित कलाकारांनी केला पाहिजे. असा अभिनेता ज्याची अद्याप प्रेक्षकांसमोर कोणतीही इमेज नाही.' इमरान पुढे असंही म्हणाला की,' मला कोणताही सिनेमा सोडल्याचा किंवा न केल्याचा कधीच पश्चात्ताप होत नाही. कारण मला वाटतं की तो सिनेमा कधी माझ्यासाठी नव्हताच.'

इमरानने 'आशिकी 2' रिजेक्ट केल्यानंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरला फायनल करण्यात आले. दोघांची जोडी प्रचंड हिट झाली. तसंच प्रेक्षकांना सिनेमाही खूप आवडला. पण इमरान म्हणला तसंच नवोदित कलाकारांमुळे सिनेमा यशस्वी झाला.

'आशिकी 2' नंतर आता 'आशिकी 3'ची सगळीकडेच चर्चा आहे. कार्तिक आर्यनच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र आशिकी 3 ची मुख्य अभिनेत्री कोण असेल याचा अजूनही शोध सुरु आहे. तारा सुतारिया, तृप्ती डिमरी, सारा अली खान अशा अनेक नावांवर चर्चा झाली मात्र अद्याप कोणालाही फायनल करण्यात आलेले नाही.

Web Title: Emraan Hashmi Was Offered Aashiqui 2 Rejected For One Reason Despite Liking The Script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.