ईडीच्या हाती लागले सुशांत व अंकिता लोखंडेचे 17 पानांचे व्हाट्सअॅप चॅट, होणार मोठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 14:08 IST2020-08-06T14:07:02+5:302020-08-06T14:08:08+5:30
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी नवी घडामोड

ईडीच्या हाती लागले सुशांत व अंकिता लोखंडेचे 17 पानांचे व्हाट्सअॅप चॅट, होणार मोठा खुलासा!!
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचे रहस्य आणखी गडद होत असताना आता याप्रकरणी एक वेगळीच माहिती समोर येतेय. होय, सुशांत सिंग राजपूत व त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे यांचे 17 पानांचे व्हाट्सअॅप चॅट अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) हाती लागले आहे.
एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोमवारी ईडीने सुशांत व अंकिता यांच्यात झालेले चॅट सीज केले आहे.
तीन आठवड्यांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केली होती. यादरम्यान सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर बिहार पोलिसांच्या विनंतीवरून ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीला सुशांत व अंकिता यांच्यातील व्हाट्सअॅप चॅटची माहिती मिळाली आहे. या आधारावर सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात मोठी मदत मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
याचदरम्यान ईडीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स जारी करत उद्या शुक्रवारी चौकशीसाठी बोलवले आहे. यापूर्वी ईडीने रियाचा सीए रितेश शाह आणि सुशांतचा सीए संदीप श्रीधरची चौकशी केली होती.
सुशांत आत्महत्या करूच शकत नाही...
अंकिता लोखंडे व सुशांत जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघे लग्नही करणार होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत तिने सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, असा दावा केला होता. तो एक जिंदादिल, मस्तमौला मुलगा होता. त्याच्यासारखी व्यक्ती आत्महत्या करूच शकत नाही, असे ती म्हणाली होती.