अभिनेत्री यामी गौतमला EDचे समन्स, लग्नानंतर मुंबईत परतताच दिला दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:18 PM2021-07-02T14:18:08+5:302021-07-02T14:18:26+5:30

नुकतीच यामी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नबंधनात अडकली. मात्र लग्न करून मुंबईत परतत नाही तोच, यामीला सक्तवसूली संचलनालयाने (ईडी)मोठा दणका दिला.

Enforcement Directorate summons actor Yami Gautam, asking her to appear before them next week | अभिनेत्री यामी गौतमला EDचे समन्स, लग्नानंतर मुंबईत परतताच दिला दणका

अभिनेत्री यामी गौतमला EDचे समन्स, लग्नानंतर मुंबईत परतताच दिला दणका

googlenewsNext
ठळक मुद्देयामी गौतम बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत ती झळकली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam ) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. नुकतीच यामी दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नबंधनात अडकली. मात्र लग्न करून मुंबईत परतत नाही तोच, यामीला सक्तवसूली संचलनालयाने (ईडी)मोठा दणका दिला. होय, ईडीने यामीला समन्स जारी केलं आहे. त्यानुसार, यामीला येत्या 7 जुलैला ईडीसमोर (Enforcement Directorate ) चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. विशेष म्हणजे, यामीला ईडीनं जारी केलेलं हे दुसरं समन्स आहे.
 परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत हे समन्स बजावण्यात आलं आहे. याचअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. यामीनं काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय ईडीला आहे. (Enforcement Directorate summons actor Yami Gautam)

यामीच्या बँक खात्यात परकीय चलनाची देवाणघेवाण झाल्याचं ईडीला आढळलं आहे.  याबद्दल अद्याप कुठलीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. परंतु या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही तर तिला अटकही केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यामी गौतम बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत ती झळकली आहे. उरी, काबील, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विकी डोनर, टोटल सियापा, बाला अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. लवकरच ती अभिषेक बच्चन स्टारर ‘दसवी’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय सैफ अली खान व अर्जुन कपूरच्या ‘भूत पुलिस’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे.
यामी गौतमनं नुकतीच दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता.  

Web Title: Enforcement Directorate summons actor Yami Gautam, asking her to appear before them next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.