रत्ना पाठकची ‘मुबारकाँ’ मध्ये एन्ट्री; अमृता सिंग आऊट?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 04:21 PM2016-11-26T16:21:05+5:302016-11-26T16:23:16+5:30
‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘एबीसीडी २’ गर्ल श्रद्धा कपूर दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांच्या ‘२ स्टेट्स’ मध्ये मुख्य भूमिकेत ...
‘ ुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘एबीसीडी २’ गर्ल श्रद्धा कपूर दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांच्या ‘२ स्टेट्स’ मध्ये मुख्य भूमिकेत होते. त्यात अर्जुनच्या आईची भूमिका अमृता सिंगने साकारली आहे. अस्सल पंजाबी महिलेची व्यक्तीरेखा अमृता सिंगने हुबेहूब वठवली आहे. आता तुम्हाला असं कळालं की, तिला अनीस बाझमींच्या ‘मुबारकाँ’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत घेण्यात आले होते आणि नंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल? अमृता सिंगच्या जागेवर रत्ना पाठक हिची निवड करण्यात आली. नुकतेच चंदीगढ येथील चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
सुत्रांनुसार,‘रत्ना पाठक ही बाझमींच्या घरी गेली होती. त्यानंतर तिला या भूमिकेसाठी घेण्यात आले. अमृता अर्जुनच्या आईची भूमिका करणार होती. जी चित्रपटात अनिल कपूरची मोठी बहीण दाखवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी तिने टीमला सांगितले की, मी शूटिंग करू शकणार नाही. मग, रत्नाच्या तारखा शूटिंगसाठी घेण्यात आल्या. आता डिसेंबरमध्ये पुढील शूटिंगचे शेड्यूल ठरवण्यात आलेय.’
निर्माता मुराद खेतानी यांनी ही वार्ता अधिकृत करत सांगितले की,‘ तारखांच्या घोळामुळे अमृता हा चित्रपट करू शकत नाही. त्यामुळे आम्ही रत्नाला त्या भूमिकेसाठी घेतले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लंडन येथे शूट होणारे शूटींग जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. ’